Chhagan Bhujbal Death Threat News: अजित पवार यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेले कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना फोनवरून जीवे मारण्याची (Death Threat) धमकी मिळाली होती. मला भुजबळ यांना मारण्याची सुपारी मिळाली आहे. उद्या मी त्यांना मारणार, असा दावा अज्ञात व्यक्तीने केला होता. दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संशयित व्यक्तीला अटक केली आहे.
प्रशांत पाटील असं अटक करण्यात आलेल्या संशयित व्यक्तीचं नाव आहे. पुणे पोलिसांनी आरोपी प्रशांत याला महाडमधून अटक केली असून त्याची कसून चौकशी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्रशांत याने दारूच्या नशेत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना धमकी दिल्याचं पोलिस चौकशीत समोर आलं आहे. प्रशांत पाटील हा मूळ कोल्हापूर येथील रहिवाशी असून त्याने दारूच्या नशेत छगन भुजबळ यांच्या मुंबईतील कार्यालयात सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास फोन केला.
आपल्याला छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाली असल्याचा दावा प्रशांत याने केला होता. मी सर्व काम सांगून करतो. उद्या सकाळी छगन भुजबळ यांना मी मारणार, अशी धमकी त्याने फोनवरून दिली होती. आता पुणे पोलिसांनी (Pune Police) प्रशांत याला अटक केली असून अधिकचा तपास सुरू केला आहे.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतून बंड करत छगन भुजबळ यांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. भुजबळ यांनी युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. सरकारमध्ये सामील होताच भुजबळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्यानं राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसून येत आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.