Maharashtra Politics: वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत गुप्त खलबतं; मुख्यमंत्री शिंदे आज मोठी घोषणा करणार?

Maharashtra Cabinet expansion News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी सोमवारी मध्यरात्री गुप्त खलबतं झाली.
Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadnavis Maharashtra Cabinet expansion News
Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadnavis Maharashtra Cabinet expansion News Saam TV
Published On

Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadnavis News: महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात नेमकं काय घडणार? याचा अजिबातही अंदाज बांधता येणार नाही. कारण, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत.

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली असून अजित पवार (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटातील नेते नाराज असल्याची चर्चा आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार करावा, अशी मागणी आमदारांकडून केली जात आहे.

Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadnavis Maharashtra Cabinet expansion News
Nitin Gadkari on Uddhav Thackeray : 'फडणवीस नागपूरला कलंक', उद्धव ठाकरेंच्या टीकेवर गडकरी संतापले; म्हणाले...

अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी सोमवारी मध्यरात्री गुप्त खलबतं झाली. यावेळी तिन्ही बड्या नेत्यांमध्ये तब्बल ३ तास गुप्त बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर (Cabinet expansion) चर्चा झाल्याची माहिती आहे.

याशिवाय कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं द्यावं? याबाबत सुद्धा विचारविमर्श करण्यात आल्याचं समजतंय. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटासह भाजपच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याची माहिती आहे.

त्यातच अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचा विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक देखील पार पडली होती.

Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadnavis Maharashtra Cabinet expansion News
NCP Crisis: 'रोहित पवार आईच्या पोटात असताना...'; छगन भुजबळांचा जोरदार पलटवार

या बैठकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यात यश आल्याची माहिती समोर आली होती. अजित पवार यांच्याकडून निधी देण्यास दुजाभाव होणार नाही, असं आश्वासन देण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री तिन्ही बड्या बैठक पार पडली.

तब्बल ३ तास सुरू असलेल्या या बैठकीत उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. येत्या एक ते दोन दिवसात शिवसेना-भाजपमधील आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. त्यानंतर तिन्ही पक्षात समान खातेवाटप होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मोठी घोषणा करू शकतात.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com