Woman Died After Abortion In Indapur Saam Tv
महाराष्ट्र

Indapur News: धक्कादायक! मुलगी नको होती म्हणून सासरच्यांनी जबरदस्ती गर्भपात केला, अतिरक्तस्रावाने महिलेचाही गेला जीव

Woman Died After Abortion In Indapur: मुलगी नको असल्यामुळे गर्भलिंग चिकित्सेनंतर महिलेवर सासरच्या मंडळींनी गर्भपात करण्यास दबाव टाकला. पण गर्भपातानंतर अतिरक्तस्रावामुळे महिलेचा मृत्यू झाला.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

मुलगी नको होती म्हणून गर्भपात केला आणि अर्भकाला जमिनीत पुरलं. गर्भपातानंतर अतिरक्तस्राव झाल्याने आईनेही जीव सोडला. ही धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावामध्ये घडली आहे. या घटनेमुळे इंदापुरमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी महिलेचा पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. पती आणि सासऱ्याला पोलिसांनी अटक केली. फरार सासूचा पोलिस शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूरच्या वडापुरी गावामध्ये राहणाऱ्या ऋतुजा राहुल धोत्रे (२३ वर्षे) या गरोदर होत्या. त्यांच्या कुटुंबीयांना मुलाची अपेक्षा होती. पण गर्भलिंग चिकित्सेनंतर त्यांच्या पोटामध्ये वाढणारे बाळ मुलगी असल्याचे समजले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी गर्भपात करण्याचे ठरवले. खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी गर्भपात करुन नकोशीला जमिनीत गाडून टाकले. पण गर्भपातानंतर अतिरक्तस्राव झाल्यामुळे महिलेचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेमुळे इंदापूरमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी ऋतुजाचा भाऊ विशालने तक्रार दाखल केली होती. महिलेच्या गर्भपाताला कारणीभूत असणाऱ्या तिचा पती राहुल भिमराव धोत्रे (२८ वर्षे), सासू लक्ष्मी भिमराव धोत्रे आणि सासरे भिमराव उत्तम धोत्रे (५० वर्षे) यांच्याविरोधात इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी महिलेचा पती आणि सासऱ्याला अटक केली आहे. तर तिची सासू फरार झाली असून पोलिस तिचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT