विनायक वंजारे, साम टीव्ही, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल धक्कादायक प्रकार घडला. काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये दोघांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु असताना भारत विरोधी घोषणा दिल्या. यामुळे तेथील संतप्त नागरिकांनी या दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आज या निषेधार्थ मालवणमध्ये संतप्त नागरिकांनी बाईक रॅलीसुद्धा काढण्यात आली.
काल चॅम्पियन्स ट्रॉफीचा भारत वि. पाकिस्तानचा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला गेला. दरम्यान हा सामना सुरु असताना मालवणमध्ये दोघा जणांनी भारताच्या विरोधात घोषणाबाजी केल्या. तेथे उपस्थित नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतरही काही समाजकंटकांनी पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा दिल्या.
मालवणमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान समाजकंटकांनी भारताविरोधी घोषणा दिल्या. भारताची फलंदाजी सुरु असताना ज्यावेळेस रोहित शर्मा बाद झाला, तेव्हा या समाजकंटकांनी पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केली. यावरुन मालवणमध्ये आज संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या प्रकरणाच्या विरोधात सर्वपक्षीय बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीच्या वेळी पोलिसांना निवेदनही देण्यात आले.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काल भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना खेळला गेला. हा महत्त्वपूर्ण सामना भारताने जिंकला. कालच्या सामन्यामध्ये भारताने ६ गडी राखून पाकिस्तानवर विजय मिळवला. भारताच्या विजयाने देशभरात जल्लोष झाला. लोकांनी फटाके फोडत, मिठाई वाटत विजय साजरा केला. परदेशातही भारतीयांनी विजय साजरा केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.