नागपुर पोलिसांच्या अडचणीत वाढ? 35 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याने खळबळ Saam Tv
महाराष्ट्र

नागपुर पोलिसांच्या अडचणीत वाढ? 35 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याने खळबळ

पोलिसांच्या मारहाणीमुळे एकाच मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपुर- नागपूर Nagpur पोलिसांच्या Police कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्न चिन्ह निर्माण करणारी दुसरी घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूरमध्ये एका ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या Suicide केल्याची घटना उघडकीस आली आहे. हुडकेश्वर Hudkeshwar पोलीस स्टेशन Police Station अंतर्गत एका व्यक्तीने पोलिसांना फेक कॉल केल्याबद्दल पोलिसांनी मारहाण केली.

या घटनेनंतर त्या तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. नागपूरमधील मनोज ठवकर या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

हे देखील पहा -

महेश राऊत नावाच्या एका 35 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. काल पोलिसांनी मारहाण केल्यामुळे महेशने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. बाजूला सुरू असलेलं भांडण थांबिण्यासाठी महेश राऊतने 100 नंबरवर कॉल केला केला होता. या कारणामुळे पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप होत आहे. लोकांसमोर पोलिसांनी मारहाण केली असल्यामुळे महेश राऊतने सुसाईड नोट लिहून रात्री आत्महत्या केली.

हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आता मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. यापूर्वीही मारहाण केल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप नागपूर पोलिसांवर आहे. त्यामुळे पुन्हा नागपूर पोलीस अडचणीत आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT