शेतकऱ्यांची वन्य प्राण्यांमुळे झोप उडाली; शेताला तार कुंपण करण्याची मागणी...

वन्यप्राण्यांमुळे ऊभ्या असलेल्या पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान
शेतकऱ्यांची वन्य प्राण्यांमुळे झोप उडाली; शेताला तार कुंपण करण्याची मागणी...
शेतकऱ्यांची वन्य प्राण्यांमुळे झोप उडाली; शेताला तार कुंपण करण्याची मागणी...संजय जाधव

संजय जाधव

बुलडाणा - जिल्ह्यात चांगल्या पावसामुळे Rain शेतकऱ्यांची Farmer पिके Crop आता बहरू लागली आहे, मात्र काही दिवसांपासुन वन्यप्राण्यांमुळे ऊभ्या असलेल्या पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामूळे शेतकऱ्यांना शेतात रात्र झाली की जागलीवर जावे लागत आहे, या शेतकऱ्यांची आता झोपच उडाली आहे.

 बुलडाणा जिल्ह्यातील डोंगर शेवली परिसरात असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याला लागुन असलेल्या शेतकऱ्यांनी साेयाबीन Soyabean, मूग,उडीद  व इतर पिकांची पेरणी केली आहे.

 हे देखील पहा -

सध्या पिके चांगल्या स्थितीत आहेत़ मात्र, गत काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा हैदाेस वाढला आहे़ वन्य प्राण्यांचे कळप शेतात शिरून पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत़ राेही, रानडुक्कर तसेच बिबट आदी प्राण्यांचा परिसरात माेठ्या प्रमाणात वावर वाढला आहे़ त्यामुळे, शेतकऱ्यांना रात्री जागल करून पिके वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे.

पिकांचे नुकसान झाल्यानंतर अनेक शेतकरी वनविभागाकडे तक्रार करतात़ मात्र, वनविभागाकडून ताेकडी मदत मिळते़ त्यातही पंचनामा करण्यासाठी बराच विलंब हाेताे. त्यामुळे मदत वाढवून देवून शेताला लागुन असलेल्या जंगलाला तार कुंपण करण्याची मागणी डोंगरशेवली परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे़. तसेच वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची गरज आहे.

रोज शेतात जगलीवर जाव लागत आहे, घरी मुलंबाळां सोडून रहावे लागते, या परिसरात अगोदर वन्यप्राण्यांमुळे दोन जणाना आपल्या प्राणास मुकावे लागलेय.माेठ्या प्रमाणात नुकसान हाेऊनही वनविभागाकडून पंचनामे करण्यास विलंब करण्यात येताे.

शेतकऱ्यांची वन्य प्राण्यांमुळे झोप उडाली; शेताला तार कुंपण करण्याची मागणी...
नागपुरात निर्बंध शिथील, पण हॉटेल व्यावसायिक मात्र नाराज!... (पहा व्हिडिओ)

वन कर्मचारी अरेरावीची भाषाही वापरतात आणि  मिळणारी मदतही ताेकडी असते वन्य प्राण्यांपासून पिके वाचवण्यासाठी  रात्रभर जागल करावी लागते. वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करून नुकसानभरपाईत वाढ व तार कुंपण करण्याची गरज आहे. वन विभागाने शेतकऱ्यांची दखल घेऊन आणि या परिसरात आणखी शेतकऱ्यांचे बळी जाऊ नये म्हणून वन विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर तार कुंपण किंवा वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com