IMD predicts unseasonal rain Mumbai Pune Thane Konkan Marathwada Vidarbha Maharashtra  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert: राज्यावर पुढील ४ दिवस अवकाळीचं संकट; मुंबईसह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather News In Marathi: पुढील ४ दिवसांत मुंबई, ठाणे आणि पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Satish Daud

Maharashtra Weather News In Marathi

दिवाळीचा सण तोंडावर असताना ऐन थंडीत राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं. मुंबई, पुणे, ठाणे, कल्याणसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना देखील घडल्या. राज्यावर अवकाळीचं संकट कायम राहिल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुढील ४ दिवसांत मुंबई, ठाणे आणि पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काळजी घ्यावी, अशाही सूचनाही हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे, असं हवामान खात्याचं म्हणणं आहे.

मुंबईसह उपनगरात अवकाळी पाऊस

मुंबईत गुरुवारी रात्रीच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शहरातील प्रदूषण पातळीत काही प्रमाणात घटली आहे. मुंबईसह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरमध्येही मुसळधार पाऊस झाला. कल्याणमध्ये झाडं कोसळण्याच्या घटना देखील घडल्या. यामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी पुढील ४ ते ५ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तुरळक पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या अनेक भागात आज म्हणजेच शुक्रवारी ढगाळ वातावरण राहणार काही ठिकाणी अवकाळीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा इशारा

मुंबईत हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी केला आहे. तर येत्या २४ तासांत पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT