major accident on bandra worli sea link 3 people dead many injured in mumbai
major accident on bandra worli sea link 3 people dead many injured in mumbaiSaam TV

Mumbai Accident News: भरधाव वेगात कार दामटवली, ६ ते ७ वाहनांना उडवले; वरळी सी लिंकवरील अपघाताचा VIDEO समोर

Worali Sea Link Accident: मुंबईतल्या वरळी सी लिंकवरील टोल नाक्यावर गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला.
Published on

Mumbai Worali Sea Link Accident News

मुंबईतल्या वरळी सी लिंकवरील टोल नाक्यावर गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. टोल नाक्यावर उभ्या असलेल्या सहा ते सात वाहनांना मागून आलेला भरधाव कारने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या भीषण अपघाताचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

major accident on bandra worli sea link 3 people dead many injured in mumbai
Crime News: हॉटेलात आढळला विवाहित महिलेसह तरुणाचा मृतदेह; पोलीस तपासात समोर आली चक्रावून टाकणारी माहिती

अपघातानंतर सी लिंकवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळीहून वांद्र्याच्या दिशेने भरधाव वेगात आलेली एक इनोव्हा कारने सी लिंकवरून जात असलेल्या एका कारला धडक दिली.

अपघातानंतर (Accident) इनोव्हा कारच्या चालकाने कार दामटवली. वेग जास्त असल्याने इनोव्हा कारने टोलनाक्यावर उभ्या असलेल्या ६ वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा ते सात जण जखमी झाले. तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.

जखमींमध्ये इनोव्हा कारच्या चालकाचा देखील समावेश आहे. अपघातानंतर वांद्रे सी लिंकवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. रात्री उशीरापर्यंत कारचालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

गेल्या वर्षीही ऐन दिवाळीच्या तोंडावर वांद्रे-वरळी सी लिंकवर अपघाताची घटना घडली होती. एका मागून एक गाड्या एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाला होता. या भीषण अपघतात ५ जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय १२ जण जखमी झाले होते. त्यामुळे वरळीहून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्ग काही काळासाठी बंद करण्यात आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com