Pimpri Chinchwad Corporation Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad Corporation : नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली नदीत भराव; जलसंपदा विभागाची पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस

Pimpri Chinchwad News : नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च करून पिंपळे निलख येथून वाहणाऱ्या मुळा नदीपात्रात पिंपरी चिंचवड महापालिकेने मोठ्या प्रमाणात भराव टाकण्याचे काम केले आहे

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली पिंपरी चिंचवड महापालिकेने मुळा नदीपात्रात भराव टाकला आहे. याबाबत जलसंपदा विभागाकडून महापालिकेला नोटीस बजावण्यात आली आहे. यानुसार नदीत टाकण्यात आलेल्या राडारोडा महापालिकेने तातडीने स्वखर्चाने काढून घ्यावा. अन्यथा योग्य कायदेशीर कारवाई करू; अशी नोटीस देऊन पिंपरी चिंचवड महापालिकेला चांगलंच फटकार आहे.

नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च करून पिंपळे निलख येथून वाहणाऱ्या मुळा नदीपात्रात पिंपरी चिंचवड महापालिकेने मोठ्या प्रमाणात भराव टाकण्याचे काम केले आहे. अर्थात या भरावामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण करण्यात आला आहे. तसेच हा भराव टाकल्यामुळे नदीच्या वहन क्षमतेत अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन लोकांच्या जीवितास धोका उद्भवू शकतो. याबाबत सामाजिक कार्यकर्ते रविराज काळे यांनी तक्रार केली होती.

राडारोडा काढण्याच्या सूचना 

हि सर्व परिस्थिती लक्षात घेता जलसंपदा विभागाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने पावसाळ्यापूर्वी स्वखर्चाने नदी पात्रात टाकण्यात आलेला नदी सुधार योजनेचा राडारोडा काढून घ्यावा; अशा सूचना जलसंपदा विभागाने दिल्या आहेत. मुळा नदीपात्रात टाकण्यात आलेल्या भराव व राडारोड्यामुळे भविष्यात नागरिकांच्या जीवास धोका उद्भवल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी ही पिंपरी चिंचवड महापालिकेची असेल असे या नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. 

मात्र महापालिकेला प्राप्त झालेली नोटीस ही नदीपत्रात उभारण्यात आलेल्या कॉपर बँक साठीच आहे. त्याचा पूर्ण नदीपात्राशी संबंध नाही; अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तसेच प्रशासक शेखर सिंह यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. यामुळे आता जलसंपदा विभाग काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : सख्ख्या ३ लहान बहिणींचा मृत्यू, अन्नातून झाली होती विषबाधा; ठाण्यातील धक्कादायक घटना

Mumbai Local Train: रेल्वे प्रवासी मित्रांनो कृपा लक्ष द्या! मध्य,हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक; जाणून घ्या किती वेळ बंद असेल लोकल

Maharashtra Live News Update: - माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयाबाहेर पत्ते खेळून आंदोलन

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे हेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतात; शरद पवार गटाच्या आमदाराचा दावा

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत? रवींद्र चव्हाण म्हणाले,राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो | VIDEO

SCROLL FOR NEXT