Nana Patole  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ... तर राज्यात काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार, शिंदे गटातील दिग्गज नेत्याचा खळबळजनक दावा

Maharashtra Election : मविआचं सरकार आलं तर काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असे वक्तव्य एकनाथ शिंदेंच्या आमदाराने केलेय.

Namdeo Kumbhar

Maharashtra Politics Latest News : राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकीचं (Maharashtra Vidhan Sabha Election) वारं वाहतेय. महायुती आणि मविआ यांच्यामध्ये मुख्यमंत्रि‍पदावरून रस्सीखेच सुरु आहे. सत्ता आली तर आमचाच मुख्यमंत्री (Maharashtra CM) होईल, असा दावा राज्यातील प्रत्येक पक्ष करत असल्याचे दिसतेय. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदाराने केलेल्या वक्तव्याने खळबळ माजली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मविआबद्दल मोठं वक्तव्य केलेय. जर राज्यात मविआचं सरकार आले तर काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा दीपक केसरकर यांनी केलाय. मविआ उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही, असाही दाव केसरकर यांनी केला.

दीपक केसरकर काय म्हणाले ?

उद्धव ठाकरे यांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने ठाकरेंची फसवणूक केली. पण जर का महाविकास आघाडीची पुन्हा सत्ता आली तर काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल. काँग्रेस उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही, असा दावा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.

आजपर्यंत मातोश्रीवरचा कुठलाही नेता सोनिया गांधी यांच्याकडे गेला नव्हता. मात्र उद्धव ठाकरेंनी ते करून दाखवलं. बाळासाहेबांनी एक वेळ पक्ष नाही राहिला तरी चालेल पण काँग्रेसबरोबर जाणार नाही, अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. मात्र या सर्व भूमिकांना उद्धव ठाकरे यांनी छेद दिलाय, असा आरोपही केसरकर यांनी केलाय.

राज्यात विधानसभा निवडणुका कधी होणार ?

२६ नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभेचा कालावधी संपत आहे. त्याआधी राज्यातील विधानसभा निवडणुका होतील, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेय. नुकताच त्यांचा राज्याचा आढावा दौरा पार पडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दसऱ्यानंतर राज्यात कधीही विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. प्रत्येक राजकीय पक्षाने तशी तयारीही केली आहे. मविआ आणि महायुती यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात पोहचलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Land Scam: मोठी बातमी! पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा, तहसीलदारांसह ९ जणांविरोधात गुन्हा

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

Liver Symptoms On Skin: चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स दिसतायेत? असू शकतं लिव्हर बिघडल्याच लक्षण, वेळीच व्हा सावध

Rashmika-Vijay Wedding: तारीख ठरली! रश्मिका आणि विजयच्या लग्नाचा बार उडणार; उदयपूरमध्ये होणार शाही विवाह

Vande Bharat Express : ४ नव्या वंदे भारत धावणार, कोणता आहे मार्ग? पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

SCROLL FOR NEXT