Bhandara Crime News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Crime News: बायकोच्या डोक्यात पाट घालून हत्या, नंतर नवऱ्यानेही कालव्यात मारली उडी

Bhandara Police: या घटनेने भंडारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भंडारा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Priya More

शुभम देशमुख, भंडारा

Bhandara News: नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या करुन नंतर स्वत: देखील आत्महत्या केलीची धक्कादायक घटना भंडाऱ्यामध्ये (Bhandara) घडली आहे. भंडारा जिल्ह्यातील सेलोटी गावामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने भंडारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भंडारा पोलीस (Bhandara Police) या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण सेलोटी गाव साखर झोपेमध्ये असताना पहाटेच्या सुमारास नवरा-बायकोमध्ये जोरदार भांडण झाले. हा वाद ऐवढा विकोपाला गेला की संतप्त नवऱ्याने पत्नीच्या डोक्यामध्ये लाकडी पाट घातला. या हल्ल्यात बायको गंभीर जखमी झाली. अतिरक्तस्राव झाल्यामुळे बायकोचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर नवऱ्याने देखील टोकाचे पाऊल उचलले.

बायकोची हत्या केल्यानंतर नवऱ्याने देखील कालव्यामध्ये उडी मारून आत्महत्या केली. भारती भारत चाचेरे (४० वर्षे) अशी हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर भारत चाचेरे (४४ वर्षे) असं बायकोची हत्या करुन आत्महत्या करणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे भंडारा जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. पोलिसांनी दोघांचे देखील मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवले. भारती आणि तिचा नवरा भारत यांच्यामध्ये काहीना काही कारणावरुन नेहमीच वाद होत होते. बुधवारी हा वाद विकोपाला गेला आणि भारतने बायकोची हत्या केली. त्यानंतर आत्महत्या करून जीवन संपवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kriti Sanon Saree Look: सणासुदीला नेसा क्रिती सॅननसारख्या 'या' ग्लॅमरस साड्या

Bathroom Vastu Tips: बाथरूममध्ये मीठ का ठेवावे? या मागील कारण काय?

Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळल्याने खाली पडले, पाठीमागून आलेल्या डंपरने चिरडले; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Jennifer Lopez : स्टेजवर गाणं गाता गाता अचानक स्कर्ट सरकला; प्रसिद्ध गायिकेसोबत नेमकं काय घडलं? VIDEO

Alzheimer: अल्झायमर का होतो? सुरुवातीची लक्षणे नेमकी कोणती?

SCROLL FOR NEXT