HSC Exam Update: बारावीच्या लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशतः बदल Saam TV
महाराष्ट्र

HSC Exam Update: बारावीच्या लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशतः बदल !

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे.. बारावीच्या लेखी परीक्षेत अंशतः बदल करण्यात आला आहे.

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

अश्विनी जाधव केदारी

पुणे : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे.. बारावीच्या लेखी परीक्षेत अंशतः बदल करण्यात आला आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलली असल्याचे सांगण्यात येत आहे. पाच आणि सात मार्च ला होणारी परीक्षा आता पाच आणि सात एप्रिलला होणार आहे. बाकीच्या पेपरचे नियोजनात कुठला ही बदल नाही असं सांगण्यात जात आहे. तसेच दहावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार, बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

५ आणि ७ मार्चच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. तर भाषा विषयांचे पेपर पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आहे. ४ मार्चला परीक्षा सुरु होणार होती तर ५ मार्चचे पेपर आता ५ एप्रिलला होणार आहेत. तसेच ७ मार्चचे पेपर आता ७ एप्रिलला होणार आहेत. बोर्डाच्या वाहनाला संगमनेर (Sangamner) येथे आग लागली होती. त्या आगीत पेपर जळून खाक झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मार्चला सकाळी हिंदी तर दुपारच्या सत्रात जर्मन जपानी चिनी आणि पर्शियन विषयाचे पेपर होणार होते. तर, ७ मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, (अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, आणि दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता.

हे देखील पहा -

५ आणि ७ एप्रिलला पेपर होणार!

५ मार्चचे पेपर आता ५ एप्रिलला होणार आहेत तर, ७ मार्चचे पेपर आता ७ एप्रिलला होणार असल्याचे समजत आहे. ५ मार्चला सकाळी हिंदी तर दुपारच्या सत्रात जर्मन, जपानी, चिनी आणि पर्शियन विषयाचे पेपर होणार होते त्यामुळे हे पेपर आता ५ एप्रिलला होतील. तर, ७ मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, (अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली पेपर. तर दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता ते आता ७ एप्रिल रोजी होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: माहिममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर; ठाकरे गटाचे महेश सावंत आघाडीवर

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

SCROLL FOR NEXT