Ukraine Attack Viral Videos: रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांचे व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल!

रशियाने युक्रेन विरुद्ध (Russia Ukraine War Updates) पुरारलेल्या युद्धनंतर (War) सातत्याने घडामोडींमध्ये बदल होत आहेत.
Ukraine Attack Viral Videos
Ukraine Attack Viral VideosTwitter/@OstapYarysh
Published On

कीव: रशियाने युक्रेन विरुद्ध (Russia Ukraine War Updates) पुरारलेल्या युद्धनंतर (War) सातत्याने घडामोडींमध्ये बदल होत आहेत. गुरुवारी सकाळी युक्रेनच्या (Ukraine) विविध भागात स्फोटही ऐकू आले. यासह युक्रेनमध्ये रशियाच्या (Russia) हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्यामध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) त्यासंबंधीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे खूपच धक्कादायक आहेत.

सोशल मीडिया साइट ट्विटरवर (Twitter) रशिया आणि युक्रेनशी संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. हे व्हिडिओ रशियन हल्ल्याशी टॅग करून शेअर केले जात आहेत. रशियाच्या हल्ल्यानंतर, काही यूजर्स सतत व्हिडिओ शेअर करत आहेत आणि तेथील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.

पहा व्हिडीओज-

हे नोंद घ्यावे की रशियन सैन्याने आज सकाळीच युक्रेनवर हल्ला केला. रशियाने या हल्ल्यासाठी आंतरराष्ट्रीय निषेध आणि निर्बंधांकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचवेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही इतर देशांना रशियाच्या कारवाईत कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com