Vadhvan Port  Saam tv
महाराष्ट्र

Vadhvan Port : वाढवण बंदरामुळे १ कोटी रोजगार कसा उपलब्ध होणार? पाहा व्हिडिओ

Vadhvan Port and employment : वाढवण बंदरामुळे लाखांमध्ये रोजगार निर्मिती होणार आहे. या बंदरामुळे रोजगार कसा उपलब्ध होणार, याबाबत जाणून घ्या.

Vishal Gangurde

मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ वाढवण बंदर उभारण्यात येणार आहे. ७६००० कोटींच्या निधीतून वाढवण बंदराचा विकास केला जाणार आहे. पालघरमधील वाढवण बंदराचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालंय. मात्र, या वाढवण बंदराला काही स्थानिकांचा विरोध आहे. या बंदरामुळे मच्छिमारांचा रोजगार बुडणार असा आरोप करण्यात येत आहे. मात्र, या बंदरामुळे जेएनपीएचे १ कोटींची रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली.

जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ म्हणाले, 'आमचा ढोबळमानाने अंदाज आहे की, वाढवण बंदरामुळे १२ लाख प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील. वाढवण बंदर पूर्णपणे तयार झाल्यावर रोजगार उपलब्ध होईल. एकास आठ असा रोजगार मानला. त्याप्रमाणे वाढवण बंदरामुळे १ कोटी रोजगार निर्माण होतील. जेएनपीए दोन ते तीन टक्क्यांवर सुरु करायचं ठरवलं, तरी आम्हाला २० हजार पास द्यावे लागले'.

'वाढवण बंदर हे त्याच्या तीन पट आहे. वाढवण बंदराची प्रचंड रोजगार निर्मितीची क्षमता आहे. बंदर हे सेवा क्षेत्र आहे. रोजगार येथे कायम स्वरुपी होत राहणार आहे. बंदराचं काम हे २४ बाय ७ असणार आहे. त्यामुळे रोजगाराची निर्मिती होईल, असे वाघ यांनी सांगितले.

बंदर बांधण्यात सर्वात कठीण बाब काय, याचं उत्तर देताना उन्मेष वाघ म्हणाले की, 'सर्वांना कठीण बाब म्हणजे लोकांना समजावून सांगणे. आम्हाला मोठ्या प्रमाणात विरोधात झाला. आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर कारमध्ये दीड तास काहीच बोललो नाही. लोक ऐकून घेण्यात तयार नव्हते. आमची लोकांसोबत पहिली भेट होती. आम्ही स्थानिकांना बंदर काय आहे, समजून घ्या. आम्ही १०००० लोकांना बंदर दाखवलं. गावातील लोकांना कामगार, कामगारांचे नेत्यांची भेट घालून दिली. कामगार नेत्यांनी बंदराची सुबकता सांगितली'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : घंटागाडीची दुचाकीला धडक, गाडीचा जागीच चक्काचूर

Sanjay Gaikwad: डिफेंडरवरुन महायुतीत नवा बवंडर? संजय गायकवाडांना कुणी घेरलंय?

मुलगी पाहण्यासाठी जाताना काळाचा घाला, इंजिनिअर तरूणासह दोघांचा अपघातात मृत्यू

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Railway Station : संतापजनक! रेल्वे स्टेशनवर प्रवाशाला शिव्या दिल्या, कॉलर पकडली; कारण फक्त समोसा

SCROLL FOR NEXT