.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
ST Employee salary News : एसटी कर्मचाऱ्यांचा पगार मंगळवारी होईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार व्हायला हवा. अर्थ खात्याकडे आम्ही भीक मागत नाही, आमचा हक्क मागत आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबईमध्ये बोलत होते. यावेळी अजितदादांवर त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला. येत्या 5 वर्षात 25 हजार बसेस घेण्याचे मान्य करण्यात आले आहे. किती एसी बस आणि किती नॉन एसी बस लागतात याचा आढावा घेणार आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. सरनाईक यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर आज त्यांनी आपला पदभार स्वीकारला. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात ते पदभार स्वीकारला.
कुठल्याही परिस्थीत प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेच्या आता एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होईल. पगारासाठी आम्ही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आमचा अधिकार मागतो. जर पगार वेळेवर पोहोचत नसेल तर शोकांतिका आहे. आमची फाईल परस्पर आमच्याकडे पोहोचते, अशी नाराजीही यावेळी सरनाईक यांनी बोलून दाखवली. स्वारगेट प्रकरण घडल्यानंतर आम्ही आता सावध झालो असून अशा चुका होणार नाहीत याची काळजी घेऊ. नव्या बसेस मध्ये पॅनिक बटण आणि CCTV असेल, असेही त्यांनी सांगितले.
एप्रिलचा पगार कधी होणार?
राज्यात आलेल्या सरकारच्या माध्यमातून मला अध्यक्षपदी नेमले. दूरदृष्टी ठेवून १३ कोटी जनतेला चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न करू आहे. काल ८७ हजार कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्न समोर आला. आम्ही मागणी केलेल्या पैशपैकी फक्त 200 कोटी मिळाले. कामगारांचे पगार 7 तारखेच्या आत केले पाहिजेत. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार ३० ते ५० हजाराच्या आत असतो. इतक्या तुटपुंज्या पगारातून त्यांना घर चालवायचे असते, त्यामुळे पगार वेळेवर व्हायला हवा. काल ताबडतोब शिंदे साहेबांशी बोलून प्रधान सचिवाची बोलून पगार 15 तारखेपर्यंत देण्याचे कबूल केले आहे. मंगळवारपर्यंत सर्व एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होईल, असे सरनाईक यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.