Devendra Fadnavis CM saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांच्या नावावर कसं शिक्कामोर्तब? फडणवीसांच्या सीएमपदाची इनसाईड स्टोरी

Devendra Fadnavis: 11 दिवसानंतर मुख्यमंत्री कोण होणार? हे स्पष्ट झालंय.. भाजपने फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. मात्र फडणवीसांचं नाव कसं ठरलं? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या नावावर तिसऱ्यांदा शिक्कामोर्तब झालंय.विधानसभेच्या निकालानंतर सुरु झालेला मुख्यमंत्रिपदाचा हाय होल्टेज ड्रामा 11 दिवसानंतर अखेर संपला आणि देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. मात्र भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांची निवड कशी झाली? पाहूयात.

सकाळी 10.40 वाजता

विधानभवनात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरु झाली

11.08 वाजता

कोअर कमिटीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं

सकाळी 11.30 मिनिट

भाजपचे विधीमंडळ सदस्य फेटे बांधून विधानभवनच्या सेंट्रल हॉलमध्ये दाखल

सकाळी 11.44 मिनिटं

गटनेता निवडीची बैठक सुरु झाली

दुपारी 12.02 मिनिटं

चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवारांकडून फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

12.04 वाजता

पंकजा मुंडेंकडून फडणवीसांच्या नावाला अनुमोदन

12.06 वाजता

देवेंद्र फडणवीसांची भाजपच्या गटनेतेपदी एकमुखाने निवड

दुपारी 12.08 मिनिटं

देवेंद्र फडणवीसांच्या नावावर विधीमंडळ पक्षनेता म्हणून शिक्कामोर्तब

दुपारी 12.30 मिनिटं

फडणवीसांनी शिवरायांना अभिवादन केलं

दुपारी 1 वाजता

फडणवीस सागर बंगल्यावर दाखल झाले

दुपारी 2.22 मिनिटं

देवेंद्र फडणवीस वर्षावर दाखल झाले

दुपारी 2.46 मिनिटं

वर्षावर महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरू झाली

दुपारी 3 वाजता

एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच गाडीतून राजभवनच्या दिशेने रवाना झाले

दुपारी 3.05 मिनिटं

तीन्ही नेते राजभवनवर पोहचले

दुपारी 3.23 मिनिटं

राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला

महायुतीने सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर 5 डिसेंबरला साडेपाच वाजता आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे. यावेळी फडणवीस महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

Ambajogai News : स्मशानभूमी नसल्याने मृतदेह ठेवला नगरपरिषद कार्यालयाबाहेर; अंबाजोगाईत लिंगायत समाज आक्रमक

Ind vs Eng : पराभवाच्या छायेत असणाऱ्या टीम इंडियाचा खुशखबर! इंग्लंडचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

Maharashtra Live News Update: “सुवर्णकारांसाठी धोरणात्मक पाठबळ सरकार देईल” – विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही

SCROLL FOR NEXT