Akola saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News : पाेलिसांची धडाकेबाज कारवाई; विदेशी, देशी रायफलींसह सहा अटकेत

हिवरखेड पाेलिसांना मिळाली हाेती टाेळीची गाेपनीय माहिती.

जयेश गावंडे

अकोल्यातील हिवरखेड (hiwarkhed) येथे आंतरराज्यीय शिकारी टोळी गजाआड करण्यात पाेलिसांना यश आले आहे. पाेलिसांनी सहा शिकाऱ्यांना अटक केली आहे. संशयितांकडून विदेशी, देशी, रायफलींसह एक गाडी जप्त करण्यात आली आहे. (hiwarkhed latest marathi news)

अकोल्यातील (Akola) हिवरखेड येथे पोलिसांनी वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दापाश केला आहे. काही जणांनी बंदुकीने वन्य जीवाचे शिकार करून ते एका चार चाकीतून तेल्हाराकडून हिवरखेडकडे येत असल्याबाबतची गोपनीय माहिती हिवरखेड पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी दोन पंच बोलावून हिवरखेडच्या सोनवाडी फाटा येथे नाकाबंदी केली. तेल्हाराकडून चार चाकी येताना दिसताच पोलिसांनी चालकास थांबण्याचा इशारा केला. त्यानंतर वाहनातील लाेकांना काही प्रश्न विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. (Maharashtra News)

पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये एका थैलीमध्ये एक हरण मृतावस्थेत प्लास्टिक मध्ये गुंडाळलेले असल्याचे दिसून आले. हे हरण थैलीच्या बाहेर काढून त्याची पंचांसमक्ष पाहणी केली असता ते मादी जातीचे हाेते. त्याचा गळा चिरलेला व मानेवर गोल छिद्र सदृश्य जखमा (injured) असल्याचे दिसून आले.

याबराेबरच एका पांढऱ्या थैलीत तीन चार्जिंग टॉर्च मिळून आल्या. काळा रंगाच्या सीट कव्हरमध्ये एक विदेशी बनावटीची रायफल व एक गावठी बनावटीची रायफल अशा दोन बंदुका मिळून आल्या. एवढेच नव्हे तर अनेक राऊंड जिवंत काडतूस व अनेक वापरलेले गोळ्यांचे रिकाम्या केस, एक पोलादी पाते, एक चाकू, व अनेक मोबाईल सुद्धा मिळाले.

या कारवाईत हिवरखेड पोलिसांनी 75,000 रुपये किमतीची एक विदेशी बनावटीची रायफल, 20,000 रुपये किमतीची एक गावठी बनावटीची रायफल, एक चार चाकी वाहन आणि इतर वस्तू असा एकूण पाच 5,84,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिवरखेड पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली. (Breaking Marathi News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार असलमउल्ला कलीमउल्ला अन्सारी (वाहन चालक), अलीमउल्ला कलीमउल्ला अन्सारी, मुदसिर अन्सारी अब्दुल्ला अन्सारी, इद्रिस अन्सारी कलीम अन्सारी, जफर अन्सारी मुक्तार अंसारी, एजाज अहमद कलीमऊल्ला (सर्व राहणार बुऱ्हानपूर मध्यप्रदेश) असे अटक केल्यांची नावे आहेत. सर्व संशयितांना न्यायालयात (court) हजर केले जाणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli News : डोंबिवलीत खांदेरी-उंदेरी किल्ल्यांची भव्य प्रतिकृती; स्वराज्य ग्रुपचा उपक्रम ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

Gold and Silver: भारतीय सराफ बाजारात होणार भूकंप; सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण

Diwali 2025: दिवाळीत अस्थमाच्या रुग्णांचा वाढू शकतो त्रास, अशी घ्या काळजी

Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Maharashtra Live News Update: फटाक्यांची ठिणगी उडाल्याचा जाब विचारल्याने वॉचमनने केली मारहाण

SCROLL FOR NEXT