
- नवनीत तपाडिया
Aurangabad Crime News : औरंगाबाद जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून (love) मुलींना, युवतींना, महिलांना तसेच विवाहित महिलांना त्रास देण्याचे प्रकार वाढल्याचे सातत्याने पाेलिसांत हाेत असलेल्या नाेंदीवरुन स्पष्ट हाेत आहे. समाज माध्यमातून बदनामी करु असे सांगून युवक, पुरुष युवतींना त्रास देताहेत. आपली बदनामी हाेऊ नये यासाठी काही वेळेला युवती, महिला पाेलिसांत धाव घेत नाहीत परंतु प्रकरण वाढल्यानंतर अथवा त्यांना खूप त्रास झाल्यास त्या पाेलिसांत (police) जात असल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार गेल्या दाेन जिल्ह्यात समाेर आला आहे. पाेलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.
आय लव्ह यू म्हण अन्यथा...
एका घटनेत मला आय लव्ह यू म्हण नाहीतर तुझ्या फोटोचे गल्लीत बॅनर लावेल व्हायरल करेल अशी धमकी महिलेला देणाऱ्या एका तरुणावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सचिन दाभाडे असे संशियताचे नाव आहे. सचिनने तक्रारदार महिला परिचित आहेत. त्याने महिलेशी जवळीक निर्माण केली. त्यानंतर वारंवार संपर्क साधून आय लव्ह यू म्हणाली नाहीस तर तुझे फोटो गल्लीतील मुलांच्या ग्रुपवर व्हायर करेल अशी धमकी दिली.
याबराेबरच तुझ्या नवऱ्या विषयी तुला काही सांगायचे आहे असे सांगून तिचा व्हाट्सअप क्रमांक इंस्टाग्राम आयडी व पासवर्ड घेतला. यातून सलगी निर्माण करत महिलेला धमकी दिली. महिलेने तो नंबर ब्लॉक केला तर तो इतर नंबर वरून फोन करून शिवीगाळ करू लागला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे.
माझ्याशी बोलली नाहीस तर तुझ्या कुटुंबीयांना संपवेन
दुस-या घटनेत एका महाविद्यालयीन तरुणीला एकतर्फी प्रेमातून त्रास देत तू माझ्याशी बोलणे का बंद केले, तू बोलली नाहीस तर मी तुझ्या कुटुंबीयास जीवे मारीन अशी धमकी तरणाने चक्क घरात जाऊन दिल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद जवळील वाळूज एमआयडीसी परिसरात उघडकीस आला आहे.
सागर कोल्हे असे या रोमिओचे नाव आहे. या रोमिओ विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी ही कुटुंबीयासह वाळुज महानगरात वास्तव्यास असून इयत्ता अकरावीच्या वर्गात शिक्षण घेते.
तीन वर्षांपूर्वी ही तरुणी किरायाच्या घरात राहत असताना घरमालकाच्या मामाचा मुलगा सागर हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तसेच तो सतत त्रास देत असल्याने तरुणीने ही गोष्ट तिच्या कुटुंबीयांना सांगितली.
यानंतर कुटुंबीयांनी सागरला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र सागरने तू माझ्याशी का बोलत नाही, तू बोलली नाही तर तुझ्या आई-वडिलांना जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने वडिलांना याप्रकरणी माहिती दिली. त्यानंतर पिडीतेच्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.