Indrajeet Sawant  Saam Tv
महाराष्ट्र

Indrajeet Sawant : इंद्रजीत सावंतांना जीवे मारण्याची धमकी; सावंतांना शिवीगाळ, शिवरायांचाही अपमान, स्पेशल रिपोर्ट

Special Report : इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. एवढंच नव्हे तर सावंतांना धमकी देताना शिवरायांचाही या उपटसुंभानं अपमान केला. कोण आहे हा धमकी देणारा आणि सावंतांनी त्याला काय उत्तर दिलं त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Yash Shirke

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना देण्यात आलेली जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इंद्रजीत सावंतांनी धमकीची कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर पोस्ट केलीय.. यात प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने इंद्रजित सावंत यांच्यावर ब्राह्मणद्वेष पसरवत असल्याचा आरोप केलाय..मात्र हा कोरटकर एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं सावंतांना धमकी देतांना थेट छत्रपती शिवाजी महाराजांचाविषयी अर्वाच्य भाषा वापरली.

अशा पोकळ धमक्यांना आपण घाबरत नसल्याचं सांगत इंद्रजीत सावंतांनी शिवरायांच्या अपमानाबद्दल प्रशांत कोरटकरवर कारवाईची मागणी केलीय.. तर प्रशांत कोरटकरने मात्र तो मी नव्हेच, असं म्हणत सावंतांवरच फेसबूकवर पोस्ट टाकल्याप्रकरणी टीका केली. दुसरीकडे सावंतांना धमकी देणाऱ्यांना संभाजी ब्रिगेड स्टाईलने धडा शिकवण्याचा इशारा संतोष शिंदेंनी दिलाय.

ऐतिहासिक विषयावर प्रदर्शित चित्रपटानंतर वाद-प्रतिवाद उफाळून येत असतात.. त्यातच आता छावा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर गद्दारी शिर्केंनी केल्याचं चित्रपटात दाखवण्यात आलंय.. तर सावंतांनी मात्र संभाजी महाराजांना पकडून देण्यात ब्राह्मण सरदारांची भूमिका असल्याचा दावा करण्यात केलाय.. मात्र वैचारिक विरोध सोडून एखाद्याला जीवे मारण्याची धमकी देणं आणि एखाद्याला धमकी देतांना थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं संतापजनक आहे. त्यामुळे कडक कारवाई करून अशा उपटसुंभांना धडा शिकवण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT