dhule, ration , ration card saam tv
महाराष्ट्र

Dhule News : गोरगरिबांच्या ताटातील रेशनवर दुकानदाराचा डल्ला ? पूरवठा विभागावर ग्रामस्थ नाराज, आंदाेलनाच्या भूमिकेत

आगामी काळात तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनास दिला आहे.

भूषण अहिरे

Dhule News : गरिबांच्या ताटातील रेशन वर डल्ला मारणाऱ्या रेशन दुकानदारा विरोधात ग्रामस्थांनी यलगार पुकारत पुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घातला. गेल्या दोन महिन्यांपासूनचे आमचे रेशन गेले कुठे असा संतप्त सवाल विचारत संबंधित रेशन दुकानदाराचा परवाना रद्द करून त्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली. आहे. जर संबंधित रेशन दुकानदारावर कारवाई करण्यात आली नाही तर प्रशासना विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देखील संबंधित घेराव घातलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी दिला आहे.  (Maharashtra News)

गरिबांना दिलासा मिळावा यासाठी शासनातर्फे मोफत रेशन वाटप करण्यात येते, परंतु गरिबांच्या रेशनावर रेशन दुकानदारांतर्फे डल्ला मारला जात असल्याचा प्रकार शिरपूर तालुक्यातील हिसाळे या ठिकाणी उघडकीस आला आहे.

शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथे रेशन दुकानदारातर्फे रेशन धारकांचा मोफत मिळणाऱ्या धान्यावर डल्ला मारला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांतर्फे लावण्यात आला आहे. संतप्त ग्रामस्थांनी संबंधित रेशन धारकाचा रेशन परवाना रद्द करावा व त्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

रेशन वाटपा दरम्यान संबंधित रेशन दुकानदारातर्फे मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप देखील यावेळी ग्रामस्थांनी लावला असून महिन्यातून फक्त तीनच दिवस रेशन दुकान खुले करण्यात येते. यादरम्यान रेशन साठ्यातील बहुतांश अन्न धान्य हे रेशन दुकानदारातर्फे देण्यात येतच नसून, मागील दोन महिने ग्रामस्थांचे रेशन पुरवठा विभागातर्फे पुरवण्यात आले परंतु संबंधित रेशन दुकानदाराने उडवा उडवीची उत्तरे देत हे दोन महिन्याचे रेशन दिलेच नसल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी लावला आहे. असा प्रकार गेल्या कित्येक महिन्यांपासून या रेशन दुकानदारातर्फे सुरू असल्याचा आरोप देखील या ग्रामस्थांनी लावला आहे.

पुरवठा विभागातर्फे वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर पुरवठा विभागाचे अधिकारी गावात याबाबतची शहानिशा करण्यासाठी पोहोचले असता, त्यांना रेशन दुकान मालकाची मनमानी वर्किज आली असून या संदर्भात लवकरात लवकर वरिष्ठांना अहवाल पोहोचून संबंधित अधिवेशन दुकानदारावर कारवाई करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले आहे.

संबंधित रेशन दुकानदारावर प्रशासनातर्फे कारवाई करण्यात न आल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालत दिला आहे. त्यामुळे गोरगरीब ग्रामस्थांच्या रेशनवर डल्ला मारणाऱ्या संबंधितांवर प्रशासनातर्फे काय कारवाई करण्यात येते हे बघणं अवचित्याचे ठरणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

SCROLL FOR NEXT