Sangamner News : मला माहित आहे माेर्चात काेण हाेते, सावध राहा ! त्यांचा हेतु चांगला नाही : बाळासाहेब थाेरात (पाहा व्हिडिओ)

निळवंडे कॅनॉलचे पाणी संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावात पोहचले. यावेळी थोरात यांच्या हस्ते जलपूजन करून नागरी सत्कार करण्यात आला.
balasaheb thorat, sangamner, nagar
balasaheb thorat, sangamner, nagarSaam TV
Published On

- सचिन बनसाेडे

Balasaheb Thorat On Sangamner Morcha News : संगमनेर मतदारसंघातील समनापूर येथे झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर तालुक्याचे आमदार तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी प्रथमच जाहीरपणे वक्तव्य केलंय. निळवंडेचे पाणी संगमनेरात (sangamner) आले असा आनंदाचा दिवस असताना शहरात दंगल घडवण्याचा काहींचा प्रयत्न होता. कुणी गुन्हा केला असेल तर कडक शासन झाले पाहिजे मात्र निवडणुकीत पराभव करू शकत नाही म्हणून मतदारसंघात जातीय राजकारण सुरू केल्याचं थोरात यांनी नमूद केले. मोर्चानंतर झालेली दगडफेक पूर्वनियोजित असावी असा संशय थोरात यांनी व्यक्त केला आहे. (Maharashtra News)

balasaheb thorat, sangamner, nagar
Kolhapur News : काेल्हापूर पूर्वपदावर; इंटरनेट सेवा सुरळीत, १९ जूनपर्यंत जमावबंदी

संगमनेरवाल्यांना मोडण्याचा प्रयत्न केला मात्र ते मोडत नाहीत म्हणून आपल्याला वेगळ्या पध्दतीने मोडण्याचा प्रयत्न सुरू आहे असेही थाेरातांनी नमूद केले. ते म्हणाले धर्माला अफूची गोळी म्हणतात, ही गोळी आपल्याला तर बसली नाही ना? याचा विचार आपण केला पाहिजे. मोर्चात कोण कोण गेलं होतं मला माहित आहे मात्र त्यांचे हेतू चांगले नाही हे लक्षात ठेवा असेही थाेरातांनी सूचित केले.

balasaheb thorat, sangamner, nagar
Satara News : युवा नेते भाऊ जाधव हल्लाप्रकरणी युवकास अटक, माहूलीत कडकडीत बंद

थाेरात पुढं म्हणाले आपल्या तालुक्यात कोणत्या जाती धर्मात भेदभाव नाही. काही लोक संगमनेरची शांतता मोडायला निघाले असून आपला तालुका सांभाळणे ही आपली जबाबदारी आहे. राज्यातही धर्मा धर्मात भांडण लावून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न सुरू असून कर्नाटक निवडणुकीनंतर अनेक घटना घटना घडताहेत असे बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com