Sharad Pawar News : कोल्हापूरमध्ये (kolhapur) जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या (maharashtra) लौकिकतेला शोभणारं नाही. माझ्या राज्यातील सर्वसामान्य जनतेला आणि विशेषत: ज्या ठिकाणी प्रकार घडले त्या ठिकाणच्या जनतेला माझे आवाहन आहे महाराष्ट्र हे संयमी, शांतताप्रिय राज्य आहे. या सगळ्या सर्वसामान्य लोकांना कायदा हातात घेण्यासंबंधीची प्रवृत्ती नाही. कुणीतरी काहीतरी करून जाणीवपूर्वक वादविवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल त्यांनाही माझा आक्षेप आहे. याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागते. सामान्य माणसाच्या हितासाठी न घडेल याची काळजी घ्या असे मत ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar statement on kolhapur incident) यांनी व्यक्त केले. (Maharashtra News)
बारामती (baramati) येथे साम टीव्हीशी बाेलताना ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले शासकीय यंत्रणेला सर्वसामान्य लोकांनी मनापासून सहकार्य द्यायची गरज आहे. आपण सगळ्यांनी या यंत्रणेला सहकार्य दिलं तर ही अवस्था तातडीने बंद झालेली दिसून येईल. कोल्हापूर शहर असो आणि अन्य शहरासो या सगळ्या शहरांचा सामाजिक परिवर्तनाचा ऐतिहासिक असा अशी पार्श्वभूमी आहे.
त्यामुळे अशी पार्श्वभूमी अशी असेल तर त्या ठिकाणी शांतता निर्माण झाली पाहिजे. शाहू महाराज, ताराराणी यांचा (kolhapur) आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामान्य माणसांच्या हिताची जपणूक केली पाहिजे. माझी खात्री आहे जर कोण चुकीचे वागत असेल पण बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारने त्याच्यामध्ये सामंज्याशी भूमिका घेतल्यानंतर त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित होईल, त्याला सगळ्यांनी साथ द्यावी असे आवाहन पवार यांनी केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.