Washim Crime News : पाेलिसांच्या छाप्यात १ लाख ८७ हजारांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त, दाेघांवर गुन्हा दाखल

गुप्त माहितीच्या आधारे पाेलिसांनी धाड टाकली.
washim
washimsaam tv

- मनोज जयस्वाल

Washim News : वाशिमच्या मानोरा येथुन १ लाख ८७ हजार ३८० रुपयांचा गुटखा मानोरा येथील तीन ठिकाणावरून मानोरा ठाणेदार व कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी धडक कारवाई करून दोघांवर गुन्हा दाखल करून एकास ताब्यात घेतले. पाेलिसांनी दुस-या संशयिताचा शाेध सुरु केला आहे. (Maharashtra News)

washim
Kolhapur News : काेल्हापूर पूर्वपदावर; इंटरनेट सेवा सुरळीत, १९ जूनपर्यंत जमावबंदी

मानोरा येथे शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला व सुंगधित तंबाखू दातार कन्फशनरी येथून विक्री होत असल्याची गुप्त माहिती कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे यांना मिळाली. त्यानी कारंजा उपविभागीय पोलीस कार्यालयातील स्टाफ सोबत घेऊन मानोरा पोलीस स्टेशनला येऊन मानोरा पाथकाला दातार कन्फशनरी, अनिल चांडक यांचे काम्प्लेंक्स मधील गोडावून, अनिस पोपटे यांचे गोडावून व दिग्रस रोडवरील शेख इम्रान शेख जैनुद्दीन यांचे काम्प्लेंक्स मध्ये शासनाने प्रतिबंधित सुंगधित तंबाखू व गुटखा विक्री ठिकाणी पोलिसांनी धाड मारली.

washim
Satara News : युवा नेते भाऊ जाधव हल्लाप्रकरणी युवकास अटक, माहूलीत कडकडीत बंद

त्या ठिकाणी सुंगधित तंबाखू, पान मसाला व गुटखा मिळून आला. त्याची किंमत १ लाख ८७ हजार ३८० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस हवालदार विनायक देवधर यांचे फिर्यादी वरून आसिफ अहमद पोपटे व अनिस अहमद पोपटे यांचे विरुद्ध (कलम १८८,२७३,३२८,३४ सह कलम ५९ अन्न व सुरक्षा मानके २००६ भादवी) गुन्हा दाखल करून आसिफ पोपटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर अनिस अहमद पोपटे याचा शाेध सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com