संदीप नागरे
हिंगोलीत राज्य सरकारच्या विरोधात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत 1450 कोटी रुपयांचा निधी खर्च करून हिंगोलीच्या कयाधू नदीतील पाणी ईसापूर धरणमार्गे नांदेडला पळविण्याचा निर्णय झाल्याने, संतोष बांगर हे विरोधकांसह राज्य सरकारवर संतापले आहेत. विशेष म्हणजे संतोष बांगर हे शिंदे गटातीलच आमदार आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सोडवताना मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच गटातील आमदारांशी संघर्ष करावा लागणार आहे.
या आधी देखील सरकारच्या वतीने हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात सापळी धरणाला मान्यता देऊन हिंगोली चे पाणी पळविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, आपण स्वतः सापळी धरण रद्द करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतरही लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून हिंगोलीच्या कयाधू नदीचे पाणी भुयारी मार्गाने ईसापूर धरणात सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय हिंगोली जिल्ह्याला वाळवंट करणारा ठरणार आहे. त्यामुळे हे काम होऊ देणार नसल्याचे सांगत राज्य सरकारच्या या निर्णयाला आमदार बांगर यांनी कडाडून विरोध केला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विशेष म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या या निर्णयानंतर या कामाची प्रशासकीय मान्यता देखील झाली आहे. मात्र आता राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात सत्तेत असलेले लोकप्रतिनिधीच विरोध करत असल्याने हिंगोलीच्या पाणी प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांमध्ये ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.