स्वप्न पूर्ण करण्याची प्रामाणिक इच्छा असेल, तर जिद्द चिकाटी आणि सातत्त्याच्या जोरावर पूर्ण करता येते. याचीच प्रचिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आली आहे. आई-वडील शेतकरी असल्याने घरात शिक्षणाचा फारसा गंध नव्हता. मात्र, तरी देखील शेतकऱ्याच्या लेकीने पीएसआय होण्याचं स्वप्न पाहिलं आणि आपल्या जिद्दीच्या जोरावर पूर्ण करून दाखवलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जयश्री निघळ असं पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झालेल्या मुलीचं नाव आहे. जयश्री मुळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील कापूस निगम या छोट्याशा गावाची रहिवासी आहे. जयश्रीच्या आई-वडील शेती करतात.
जयश्रीचे शालेय शिक्षण गावातच पूर्ण केलं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ती वैजापूर शहरात आली. अकरावी बारावी मध्ये विज्ञान शाखा निवडली. मात्र त्यामध्ये रस नसल्यामुळे तिला बारावी मध्ये कमी मार्क पडले. याच दरम्यान चुलत भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासंदर्भात मार्गदर्शन करू लागला.
तेव्हापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचं जयश्रीने ठरवलं. यासाठी तिने छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहर गाठलं. जयश्रीने सुरुवातीला खाजगी कोचिंग क्लासमध्ये शिकवण घेतली. मात्र, अभ्यासाचा अंदाज आल्यानंतर तिने स्वतःच अभ्यास करायला सुरुवात केली.
जयश्री 2017 साली जेव्हा पोलीस उपनिरीक्षक पदाचा पहिला पेपर दिला. तेव्हा फॉर्म भरण्यात चूक झाल्याने पास होऊनही तिचं पीएसआय पद गेलं. अशातच न खचत जयश्रीने पुन्हा जिद्दीने अभ्यास सुरू केला. 2019 मध्ये जयश्रीने पुन्हा पीएसआय परीक्षेचा पेपर दिला.
तेव्हा सुद्धा कमी मार्क पडल्याने जयश्रीची पीएसआय बनण्याची संधी थोडक्यात हुकली. पुढे जयश्रीने जिद्दीने अभ्यास सुरूच ठेवला. न थांबता तिने दिवस रात्र मेहनत घेतली. आपल्या जिद्दीच्या जोरावर अखेर जयश्रीने 2020 मध्ये पीएसआय परीक्षेचा पेपर दिला. यामध्ये दिला घवघवशीत यश मिळालं.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.