Hingoli Youth End Life  Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli: पोलिस होण्याआधीच तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, राहत्या घरात आत्महत्या; हिंगोलीत खळबळ

Hingoli Youth End Life: हिंगोलीमध्ये पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केली. या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

Priya More
  • हिंगोलीमध्ये तरुणाची आत्महत्या

  • राहत्या घरी तरुणाने घेतला गळफास

  • हा तरुण पोलिस भरतीची तयारी करत होता

  • नोकरी न मिळाल्यामुळे तो नैराश्येत गेला होता

संदिप नागरे, हिंगोली

हिंगोलीमध्येमध्ये पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली. हिंगोलीच्या औंढा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रुपुर गावात ही घटना घडली. अर्जुन गीते असे या तरुणाचे नाव असून तो पोलिस भरतीसाठी सराव करत असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करून देखील नोकरी मिळत नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. औंढा पोलिस ठाण्यामध्ये याप्रकरणी नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या औंढा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रूपुर गावात २४ वर्षाच्या तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अर्जुन शिवाजीराव गीते असे या तरुणाचे नाव होते. शनिवारी रात्री अर्जुन नेहमीप्रमाणे मावशीच्या घरी अभ्यासासाठी गेला होता. मात्र तो सकाळी उठला नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा दरवाजा उघडला असता त्याने गळफास घेतल्याचं उघडकीस आहे. अर्जुनला या अवस्थेत पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली.

या घटनेची माहिती औंढा पोलिसांना देण्यात आली. औंढा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत अर्जुनचा मृतदेह खाली उतरवत शवविच्छेदन करण्यासाठी औंढा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. अभ्यासात हुशार असलेल्या अर्जुन गीतेने पदवीपर्यंत शिक्षण घेत पोलिस भरती आणि स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. मागील वर्षी पोलिस भरतीमध्ये गुण कमी मिळाल्याने त्यांची नोकरीची संधी हुकली होती.

पुन्हा तो नोकरी मिळवण्यासाठी पोलिस भरतीची तयारी करत होता. पण काहीच संधी मिळत नसल्यामुळे तो नैराश्येत गेला. नोकरी न मिळाल्याने नैराश्यात असलेल्या अर्जुनने अखेर टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले. अर्जुन गीतेच्या पश्चात आई- वडील असा परिवार आहे. कुटुंबातील एकुलता एक मुलगा गेल्याने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पोलिसांनी अर्जुन शिवाजी गीते यांच्या मृत्यूप्रकरणी नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरच्या घरी बनवा चटपटीत 'क्रिस्पी पोहा वडे'; एकदम सोपी आहे रेसिपी

Budget Honeymoon : खिशात जास्त पैसे नाहीत? स्वस्त आणि मस्त 'या' ७ जागांवर प्लॅन करा ड्रीम हनिमून

Maharashtra News Live Update: रायगडच्या नागोठण्यात पुर परिस्थिती बिकट

Tharala Tar Mag: 'सायली नाही... आता तन्वी म्हणायचं'; 'ठरलं तर मग'मध्ये अखेर रंगणार ग्रँड सेलिब्रेशन

Alia Bhatt : बॉलिवूड गाजवणाऱ्या आलिया भट्टचं शिक्षण किती माहित आहे का?

SCROLL FOR NEXT