Shocking : भयंकर! पतीने फोन चेक केला; पत्नीने छातीवर बसून ओढणीने आवळला गळा, सासूने दार उघडलं अन्...

Delhi Murder Crime News : दिल्लीत पत्नीने पतीचा गळा आवळून हत्या केला असून पोलिसांनी २० वर्षीय आरोपी महिलेला अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
DELHI SHOCKER: WIFE ALLEGEDLY STRANGLES HUSBAND TO DEATH AFTER PHONE CHECK DISPUTE, ARRESTED
DELHI SHOCKER: WIFE ALLEGEDLY STRANGLES HUSBAND TO DEATH AFTER PHONE CHECK DISPUTE, ARRESTEDSaam Tv
Published On
Summary
  • दिल्लीतील जगतपुरी परिसरात पत्नीने पतीची हत्या केली

  • फोन तपासल्याने झालेल्या वादानंतर पत्नीने केली हत्या

  • आरोपी महिलेला अटक केली असून तपास सुरू आहे

राजधानी दिल्लीतील जगतपुरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने पतीला जीवे मारण्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. दरम्यान मृत व्यक्तीने आरोपी महिलेचा फोन चेक केला, याच वादातून पत्नीने पतीचा काटा काढला. याप्रकरणी पोलिसांनी २० वर्षीय पत्नीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जगतपुरी येथील रशीद मार्केट परिसरात राहणाऱ्या मुस्तकीम उर्फ साहिल आणि त्याची पत्नी अलीशा यांच्यात काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. मुस्तकीमला पत्नीचे अन्य व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय होता. बुधवारी मध्यरात्रीनंतर त्याने पत्नीचा फोन चेक केला. कॉल रेकॉर्ड आणि इतर माहिती पाहत असताना दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. चौकशीदरम्यान अलीशाने सांगितले की, पतीने तिला मारहाण केली होती. त्यानंतर ती संतापली आणि तिने मुस्तकीमला खाली पाडून त्याच्या छातीवर बसत ओढणीने त्याचा गळा आवळला.

DELHI SHOCKER: WIFE ALLEGEDLY STRANGLES HUSBAND TO DEATH AFTER PHONE CHECK DISPUTE, ARRESTED
Rain Alert : पुण्यासह रायगडला रेड अलर्ट; पुढील ७२ तास महत्त्वाचे, राज्यात पावसाची दमदार बॅटिंग

घटनेनंतर काही वेळातच मुस्तकीमची आई खोलीत आली. मुलाची अवस्था पाहून तिने आरडाओरडा केला. दरम्यान, घाबरलेल्या अलीशाने घटनास्थळावरून पळ काढला. कुटुंबीयांनी तत्काळ मुस्तकीमला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती जगतपुरी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मृताच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले.

DELHI SHOCKER: WIFE ALLEGEDLY STRANGLES HUSBAND TO DEATH AFTER PHONE CHECK DISPUTE, ARRESTED
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्वाची माहिती, बँक खात्यात ३००० रुपये जमा होणार? वाचा

घटनेनंतर फरार झालेल्या अलीशाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले होते. अखेर गुरुद्वाराजवळ ती लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. सध्या आरोपी महिलेची चौकशी सुरू असून या प्रकरणाचा अधिक तपास जगतपुरी पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com