Hingoli News  Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : पिसाळलेलं कुत्रं विहिरीत पडलं, अख्ख गाव रुग्णालयात धावलं; हिंगोलीतील प्रकारने सर्वच चक्रावले

Hingoli Latest News : पिसाळलेलं कुत्रं विहिरीत पडल्याची घटना घडली. त्यानंतर अख्ख गाव रुग्णालयात धावल्याची घटना घडली. या प्रकारानंतर हिंगोलीतील सर्वच चक्रावले. वाचा नेमकं काय घडलं?

संदीप नागरे

Hingoli Latest News : हिंगोलीतून चक्रावणारी घटना समोर आली आहे. हिंगोलीत पिसालळेला कुत्रा विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाने सर्व गावाने विहिरीतील पाणी प्यायलं. त्यानंतर संपूर्ण गाव रुग्णालयात पोहोचलं. त्यानंतर सर्व गावकऱ्यांना आरोग्य विभागाकडून अँटी रेबीज लस देणे सुरु करण्यात आलं आहे. हिंगोलीतील साखरा तांडा गावात हा प्रकार घडला आहे.

हिंगोलीच्या सेनगावात तालुक्यातील साखरा तांडा गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हिंगोलीत साखर तांडा गावात पिसाळलेला कुत्रा विहिरीत पडला. त्याच विहिरीतील पाणी गावातील लोकांनी प्यायलं. गावकऱ्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. गावकऱ्यांनी तातडीने आरोग्य विभागाकडून अँटी रेबीज लस घेतली. ही अँटी रेबीज लस घेण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. या प्रकाराची आजबाजूच्या गावातही जोरदार चर्चा आहे.

नेमकं काय घडलं?

हिंगोलीत पिण्याच्या पाण्याची काळजी न घेणं गावकऱ्यांना चांगलंच महागात पडलं आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील साखरा तांडा गावात पाणीपुरवठा करण्यासाठी असणाऱ्या एका विहिरीमध्ये पिसाळलेला कुत्रा पडला आणि त्याचा मृत्यू झाला. सकाळी गावकऱ्यांना ही बाब निदर्शनास आली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी नेहमीप्रमाणे या विहिरीचं पाणी प्यायलं. मात्र मृत अवस्थेत विहिरीच्या तळाशी गेलेला कुत्रा पाण्याच्या वर तरंगल्याने गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

त्यानंतर गावकऱ्यांनी रुग्णालय गाठायला सुरुवात केली. मात्र रुग्णांची संख्या जास्त असल्याने आरोग्य विभागाने डॉक्टरांच्या पथकाला साखरा तांडा गावात पाठवत अँटी रेबीज लस टोचली आहे. आतापर्यंत दीडशे पक्षा अधिक गावकऱ्यांना ही लस दिली आहे. रविवारी म्हणजे उद्या देखील उर्वरित गावकऱ्यांना सुरक्षेचा उपाय म्हणून ही लस देण्यात येणार असल्याची माहिती हिंगोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके यांनी दिली आहे. या प्रकारानंतर गावातील भीती पसरली होती. मात्र, अँटी रेबीज लस टोचून घेतल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं ₹४००० तर चांदी ११००० रुपयांनी महागली, युद्ध थांबताच काही तासात विक्रमी वाढ; वाचा ताजे दर

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मद्यधुंद दुचाकीस्वाराने लहान मुलाला उडवले; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Professional Cuddler Job: मार्केटमध्ये आलाय नवीन जॉब, मिठी मारा अन् लाखो रूपये कमवा

Actress Mother Death : मातृछत्र हरपले! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचे निधन, बॉलिवूडवर शोककळा

Eknath Shinde: मोठी बातमी! एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT