Crime news: ब्रेकअपनंतर एक्स बॉयफ्रेंडने मागितले तिच्यावर खर्च केलेले पैसे, नव्या बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला त्याचा काटा

Ranchi crime news: संदीप महतो नावाच्या तरूणाचे ४ वर्षांपासून आरती कुमारीसोबत प्रेमसंबंध होते. संदीपला अटक होते. आरती पुन्हा एकदा प्रेमात पडते आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने एक्सचा काटा काढते.
crime news
crime newsAI Photo
Published On

प्रेम हे प्रेम असतं पण प्रेम कधी कधी मृत्युच्या दाढेतही ओढावून नेतं. आधी प्रेम जुळलं. नंतर प्रेयसीचे कुटुंबिय प्रियकराविरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करतात. प्रियकराला अटक होते. प्रेयसी पुन्हा एकदा प्रेमात पडते आणि तुरूंगातून सुटलेल्या एक्स प्रियकराचा, बॉयफ्रेंडच्या मदतीने निर्घृण हत्या करते. ही धक्कादायक घटना झारखंडची राजधानी रांचीमध्ये घडली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रांचीच्या पिथोरिया पोलीस ठाणे परिसरात राहणाऱ्या संदीप महतो नावाच्या तरूणाचे ४ वर्षांपासून आरती कुमारीसोबत प्रेमसंबंध होते. प्रेयसी आरतीचे कुटूंब संदीपविरूद्ध नाराज असतात. आरतीच्या कुटुंबाने संदीपविरूद्ध लैंगिक अत्याचाराचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात संदीपला अटक केली.

crime news
Amravati Crime: काळं फासलं, मिरचीची धुरी अन् नग्न अवस्थेत धिंड, जादुटोण्याच्या संशयावरून ७७ वर्षीय महिलेसोबत अमानुष प्रकार

या प्रकरणानंतर आरतीच्या आयु्ष्यात दुसरा आला. संगम लोहरा आणि आरतीचे रिलेशनशिप सुरू झाले. आरती आणि संगमचे रिलेशनशिप सुरू असताना, संदीपची तुरूंगातून सुटका होते. संदीप बाहेर येताच त्याने आरतीची भेट घेतली. पुन्हा संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. मात्र, आरतीने नकार दिला. संतापलेल्या संदीपने तिला रिलेशनशिपमध्ये खर्च केलेल्या पैशांची मागणी केली.

crime news
Chhatrapati Sambhaji Nagar: माणुसकीही मेली...मृत महिलेच्या अंगावरील सोनं अन् पैसेही केले गायब, हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं?

याच गोष्टीला कंटाळून तिने संगमसोबत संदीपच्या हत्येचा कट रचला. तिने संदीपला तुसू मेळ्यात बोलावून घेतलं. आरती संदीपला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेली. जिथे आरतीचा प्रियकर संगम आणि त्याचे दोन मित्र आधीच उपस्थित होते. त्यानंतर सर्वांनी मिळून संदीपवर चाकूने सपासप वार करत त्याची हत्या केली. ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणानंतर रांची हादरली असून, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com