Hingoli Water Shortage Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Water Shortage : पुराचा फटका; हिंगोलीत सात दिवसांपासून पाणीपुरवठा बंद, पुरात वाहून गेली मुख्य जलवाहिनी

Hingoli News : मागील आठवड्यात हिंगोली शहरासह परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यात अनेकांच्या घरात, दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते.

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोलीत आलेल्या महापुरामुळे हिंगोली शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. यामुळे मागील सात दिवसांपासून शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थात भर पावसाळ्यात हिंगोली शहरातील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. 

मागील आठवड्यात हिंगोली (Hingoli) शहरासह परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यात अनेकांच्या घरात, दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते. दरम्यान याच पुरात हिंगोली शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईनच वाहून गेली आहे. यामुळे शहरातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उद्भवला आहे. हिंगोली पालिकेच्या पाणीपुरवठा (Water Supply) विभागाकडून या पाईप लाईनच्या दुरुस्तीचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. 

मागील सात दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पाईप लाईन दुरुस्तीचे काम अजून पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याने पाणी पुरवठा होणे अशक्य आहे. परिणामी हिंगोली शहरातील एक लाखांपेक्षा अधिक नागरिकांना शुद्ध पाणी पैसे देऊन खरेदी करावे लागत आहे. दरम्यान शहरातील नागरिकांनी विहिरी व बोरवेलचे पाणी उकळून प्यावे; असे आवाहन हिंगोली पालिकेसह आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

SCROLL FOR NEXT