Hingoli News : Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : ऐन विधानसभा निवडणुकीत हिंगोलीत दोन गटात दगडफेक; नागरिकांसह पोलिसही जखमी, घटनास्थळी परिस्थिती काय?

Hingoli Latest News : ऐन विधानसभा निवडणुकीत हिंगोलीत दोन गटात दगडफेकीची घटना घडली आहे. या घटनेत नागरिकांसह पोलिसही जखमी झाले आहेत.

संदीप नागरे

हिंगोली : राज्यात सर्वत्र निवडणुकीची धामधूम पाहयाला मिळत आहे. उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी त्याचे समर्थक रस्त्यावर हजारोंनी गर्दी करत आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान हिंगोलीत दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. हिंगलोतील वसमत तालुक्यातील इंजनगावमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली. त्यानंतर हाणामारीचे रुपांतर दगडफेकीतही झाले. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. अकोल्यानंतर हिंगोलीत दोन गटात दगडफेकीची घटना घडल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील इंजनगावमध्ये जागेच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. हाणामारीच्या या घटनेनंतर अचानक दोन्ही गटातील महिला आणि तरुणांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीच्या घटनेत गावातील महिला नागरिकांसह सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

वसमत ग्रामीण पोलिसांनी दगडफेक आणि मारहाण करणाऱ्या एकूण १४१ ग्रामस्थांवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर जखमी पोलीस कर्मचारी आणि नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या इंजनगावमध्ये तणावाची स्थिती आहे. तर हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भेट दिली आहे. सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात केला आहे.

अकोल्यातील हरिपेठेत झाली होती दंगल

काही दिवसांपूर्वी अकोल्यात दोन गटात मोठा राडा झाला होता. दोन गटातील दगडफेकीनंतर मोठ्या प्रमाणात जाळपोळही झाली होती. अकोल्यातील हरीपेठ भागात झालेल्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला होता. एका रिक्षाला धक्का लागल्याने वाद पेटला होता. त्यानंतर दोन गटात तुफान राडा झाला होता. या राड्याचे रुपांतर दगडफेक आणि जाळपोळीत झालं होतं. या घटनेत अनेक नागरिक जखमी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT