Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : मुख्यमंत्री हरवलेत, शोधून देणाऱ्यास बक्षीस; हिंगोलीच्या गोरेगावमध्ये पोस्टर झळकले

HIngoli : राज्यातील अनेक भागात यंदा कमी पाऊस झाला आहे. यात हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांचा हंगाम गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई म्हणून विम्याची रक्कम मिळणे अपेक्षित होते

संदीप नागरे

हिंगोली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हरवले आहेत, शोधून देणाऱ्याला योग्य बक्षीस दिले जाईल; अश्या आशयाचे पोस्टर हिंगोलीत झळकले आहेत. (Hingoli) हिंगोलीच्या गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयाच्या पुढे स्वाभिमानी शेतकरी संघटना व (Farmer) शेतकऱ्यांनी एकत्र येत हे पोस्टर्स लावले आहेत.  (Latest Marathi News)

राज्यातील अनेक भागात यंदा कमी पाऊस झाला आहे. यात हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांचा हंगाम गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई म्हणून विम्याची रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र (Crop Insurance Company) पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे १८० कोटी रुपये देण्यास टाळाटाळ होत आहे. अश्या कठीण परिस्थितीत मायबाप म्हणून सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असताना सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दिर्लक्ष केले जात आहे. एकीकडे बँकेचे डोक्यावर चढलेलं कर्ज आणि दुष्काळामुळे शेतात नापिकी होऊन आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हरवले असल्याचे हे पोस्टर लावले आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांना देणार साथ

Makeup Tips: जुने मेकअप प्रॉडक्ट्स वापरताय? होऊ शकतं इन्फेक्शन, अशी घ्या काळजी

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Live News Update: धुळ्यात मंकीपॉक्सचा सहावा रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT