Fake Fertilizer Sale at Hingoli  Saam tv
महाराष्ट्र

Fake Fertilizer : शेतकऱ्यांना चक्क बनावट खताची विक्री; खत विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल

Fake Fertilizer Sale at Hingoli: खरीप हंगामाच्या तोंडावर विक्रेत्यांकडून खतांचा साठा करून ठेवण्यात येत असतो. दरम्यान निलावार हे बनावट खतांची विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती.

संदीप नागरे

हिंगोली : खरीप हंगाम सुरु झाला असून खत, बियाणे खरेदी सुरु झाली आहे. यात काही विक्रेत्यांकडून बनावट बियाणे, खतांची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार हिंगोलीमध्ये बोगस खतांचा साठा आढळल्याने खळबळ उडाली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत गोडावून सील करत खत विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हिंगोली शहरातील खत विक्रेता कृष्णा चंद्रशेखर निलावार असे बोगस खताचा साठा तयार करून विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकाचे नाव आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर विक्रेत्यांकडून खतांचा साठा करून ठेवण्यात येत असतो. दरम्यान निलावार हे बनावट खतांची विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार कृषी विभागाच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांच्या चौकशीत गोडाऊन मधील खत चक्क डुप्लिकेट निघाले आहे 

गोडाऊनला सील लावत गुन्हा दाखल 
खतांचा साठा बनावट असल्याचे समजताच हिंगोली शहरात खत विक्रेत्याचा गोडाऊन सील केला आहे. दरम्यान या प्रकारानंतर बळीराजाची फसवणूक करू पाहणाऱ्या हिंगोली शहरातील खत विक्रेत्याविरोधात थेट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या खत विक्रेत्याने बोगस खताची किती शेतकऱ्यांना विक्री केली याची माहिती कृषी विभागाचे अधिकारी घेत आहेत. 

थेट परवाना रद्दची करणार कारवाई 

कृषी विभागाकडून संपूर्ण चौकशी करत कृषी केंद्राचा परवाना देखील रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान बोगस खताचा साठा आढळल्याने क्रांतिकारी संघटना संतप्त झाली आहे. तसेच आज क्रांतिकारी संघटनेने हिंगोलीत कृषी विभागाच्या गळ्यात घालण्यासाठी पैशाचा हार आणला होता. यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांची अडवणूक केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime : घरात सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय; डमी ग्राहक पाठवत पोलिसांची छापेमारी, दांपत्याला अटक

Pune Accident: श्रावण सोमवारी भाविकांवर काळाचा घाला, ३५ जणांना घेऊन जाणारा टेम्पो दरीत कोसळला; चौघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचवताना पती विहिरीत पडल्या

Milk For Skincare : अशाप्रकारे करा त्वचेसाठी दुधाचा वापर, त्वचा होईल टवटवीत, चेहरा दिसेल तरूण

सैराट! प्रेमप्रकरणातून दोघे फरार, भावानं रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीचं मुंडन करत संपवलं; दाजीचाही जीव घेतला

SCROLL FOR NEXT