Hingoli Crime News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime News : सख्खा भाऊ पक्का वैरी; आधी केली भावाची हत्या, अंत्यसंस्कार करत दिली हरविल्याची तक्रार

Hingoli News : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके शेत शिवारात वडिलोपार्जित खोडके परिवाराची जमीन आहे. दोन भाऊ असल्याने दोघांना सामान वाटणी व्हावी; यासाठी लहान भाऊ शिवाजी याचा जमिनीत हिस्सा राहू नये.

संदीप नागरे

हिंगोली : वडिलोपार्जित शेत जमिनीच्या प्रॉपर्टीमध्ये भावाभावांमध्ये वाद होत असल्याच्या घटना समोर येत असतात. त्याच नुसार शेतजमिनीमध्ये हिस्सेदार नको म्हणून स्वतःच्या भावाची हत्या करत त्याला जमिनीत बुजून देण्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामधील शेगाव खोडके या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत शिवाजी किसान खोडके (वय २२) मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके शेत शिवारात वडिलोपार्जित खोडके परिवाराची जमीन आहे. दोन भाऊ असल्याने दोघांना सामान वाटणी व्हावी; यासाठी लहान भाऊ शिवाजी याचा जमिनीत हिस्सा जावू नये. यासाठी मोठ्या भावाने लहान भावाचा गळा दाबून खून केला.

पोलिसात हरविल्याची दिली तक्रार 

शिवाजी किसन खोडके असे खून झालेल्या लहान भावाचे नाव आहे. तर हरिभाऊ किसन खोडके या मोठ्या भावाने धक्कादायक कृत्य केले आहे. धक्कादायक म्हणजे मोठ्या भावाने शिवाजी याचा खून केल्यानंतर शेतातचा खड्डा खोदून पुरावा नष्ट करण्यासाठी भावावर अंत्यसंस्कारही करून टाकले. त्या नंतर पोलीस ठाण्यात दाखल होत आपला लहान भाऊ हरवला असल्याची तक्रार देखील दाखल केली. यामुळे पोलिसांनी शिवाजी याचा शोध घेण्यास सुरवात केली होती. 

खून केल्याची दिली कबुली 

मात्र तपास करत असताना पोलिसांना हरिभाऊ याच्यावर संशय आला. यामुळे पोलिसांनी भाऊ हरविल्याची तक्रार दाखल करणाऱ्या भावाला पोलीस खाक्या दाखवताच त्याने खुन केल्याची कबुली दिली असून शिवाजी याला जमिनीत पुरल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आता या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करत संशयित आरोपी हरिभाऊ याला ताब्यात घेतले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी अमरावतीत पावसाची दमदार हजेरी

माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षात उभी फूट; 20 खासदारांनी बनवला वेगळा गट, लोकसभा अध्यक्षांना दिलं पत्र

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय नाहीतर...

Aali Lakhabai Song: रौद्र रूप, दमदार नृत्य अन् लोकसंगीताची जादू; अमृता धोंगडेचा 'आली लखाबाई' गाणं प्रदर्शित

Navi Mumbai : सलग ३-४ दिवस लाईट नसल्यानं महिलेचा आक्रोश; उशी - चादर घेऊन थेट महावितरणच्या ऑफिसमध्ये पोहोचली, VIDEO

SCROLL FOR NEXT