Hingoli Crime Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime : धक्कादायक.. खुनाच्या आरोपातील संशयिताचा कोठडीतून व्हिडिओ कॉल; पैशांसाठी पोलिसानेच करून दिले संभाषण

Hingoli News : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके या गावात सख्ख्या मोठ्या भावाने प्रॉपर्टीचा हिस्सा लहान भावाला मिळू नये; म्हणून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती.

संदीप नागरे

हिंगोली : सेनगाव तालुक्यात सख्ख्या भावानेच आपल्या लहान भावाची हत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र या संशयित आरोपी चक्क पोलीस कोठडीमधून व्हिडिओ कॉलवर बोलत आहे. तर पैसे मिळविण्यासाठी पोलिसानेच व्हिडीओ कॉलवर संभाषण घडवून आणल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके या गावात सख्ख्या मोठ्या भावाने प्रॉपर्टीचा हिस्सा लहान भावाला मिळू नये; म्हणून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेत संशयित आरोपी असलेला मोठा भाऊ हरिभाऊ किसन खोडके याला गोरेगाव पोलिसांनी अटक देखील केली होती. सध्या हरिभाऊ खोडके हा पोलीस कोठडीत आहे. 

सोने व्यापारीला व्हिडीओ कॉल 

दरम्यान खुनाच्या घटनेत गोरेगाव पोलीस स्थानकातील एक पोलीस कर्मचाऱ्याने संशयित हरिभाऊ याच्याकडून पैसे उकळण्यासाठी चक्क पोलीस कोठडीमधून व्हिडिओ कॉल करण्याची मुभा दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. आरोपीने पोलीस कोठडीमधून सोने- चांदी व्यापाऱ्याला फोनवर बोलत असून आरोपीने ठेवलेली सोन्याची चैन मोडून पोलीस कर्मचाऱ्याने पाठवलेल्या गिऱ्हाईक व्यक्तीला पैसे द्यावेत; असे सांगत असल्याचे दिसत आहे.  

नातेवाईकांच्या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश 

तर एक व्यक्ती सोन्या- चांदीच्या व्यापाऱ्याकडून पैसे देखील मोजून घेत असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या घटनेनंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी हिंगोलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणात आता पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी; अशी मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस उपाधीक्षक सुरेश दळवी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi Puri Recipe: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा मेथीची कुरकुरीत पुरी, सोपी आहे रेसिपी

Municipal Elections Voting Live updates : नवी मुंबई तुर्भेतील मतदारांचा संताप; संपूर्ण नवी मुंबईतील सर्वात खराब मतदान यंत्रणा तुर्भेलाच?

Municipal Elections: अकोल्यात नुसता राडा! मतदान केंद्रावर भाजप आणि शिवसेना आमनेसामने, केंद्राबाहेर फ्री स्टाईल हाणामारी

Saam TV Exit Poll : तुमच्या महापालिकेत कुणाची सत्ता? थोड्याच वेळात पाहा महा एक्झिट पोल, EXCLUSIVE

बोगस आणि तोतया मतदारांवर थेट गुन्हा दाखल होणार! राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचा कडक इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT