viral video x
महाराष्ट्र

Video : शिक्षिकेच्या बदलीने गावाला गहिवरून आले, चिमुकले कोपऱ्यात बसून रडले; पालक-आजोबांचा कंठ दाटला

Hingoli : हिंगोली जिल्ह्यातील एका गावात शाळेत शिकणाऱ्या शिक्षिकेची बदली झाली. लाडक्या शिक्षिकेची बदली झाल्याने विद्यार्थ्यांसह संपूर्ण गाव रडले. या गावातला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Yash Shirke

  • हिंगोलीतील शिक्षिका कल्पना वानरे यांची बदली झाली.

  • यामुळे विद्यार्थ्या आणि गावकरी भावूक झाले.

  • व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

संदीप नागरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Hingoli News : राज्यभरात सध्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु आहे. गावांपासून शहरांमध्ये शिक्षकांची बदलीसत्र सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे देत त्यांना लळा लावणाऱ्या शिक्षकांची बदली होत असल्याने विद्यार्थी रडताना दिसत आहेत. अशीच घटना हिंगोलीत एका शाळेत घडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील आसोंदा गावात प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिका कल्पना वानरे यांची दुसऱ्या शाळेत बदली झाली. हिंगोलीच्या पेडगाव जिल्हा परिषद शाळेत त्या रुजू होणार आहेत. २०१८ ते २०२५ या सात वर्षात त्यांनी विद्यार्थ्यांना मायेचा ओलावा देत शिक्षणाचे धडे दिले.

विद्यार्थ्यांच्या लाडक्या कल्पना मॅडम यांची बदली झाल्याची बातमी समजताच त्यांनी अक्षरक्ष: टाहो फोडला. चिमुकल्यांसह गावातील महिला अगदी वयोवृद्ध मंडळीही धाय मोकळून रडू लागले. आपल्या कुटुंबातील कुणीतरी कायमचे निघून जाते असे दु:ख गावातील चिमुकले विद्यार्थी आणि त्यांचा पालकांना झाले होते. या आसोंदा गावातला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांना निरोप देताना कल्पना मॅडमदेखील भावूक झाल्याचे पाहायला मिळते.

शिक्षिका कल्पना वानरे यांनी शिक्षणासोबतच ओंसादा गाव हागणदारी मुक्त केले होते. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेत उतरुन यश मिळून दिले. यासोबतच त्यांनी शाळेत विद्यार्थ्यांना अध्यापनाचे आनंददायी धडे दिले. त्यांच्या अशाच कार्यामुळे त्यांची बदली झाल्याने संपूर्ण आसोंदा गाव रडले आहे. त्यांचा व्हिडीओ पाहून असेच शिक्षक प्रत्येकाला मिळावे असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana News : अजित पवारांना मोठा धक्का; बाजार समितीच्या १३ सदस्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव, नेमकं काय घडलं?

Devmanus: 'मी संपणाऱ्यातील नाहीये…'; माधुरीला कोणी मारलं? 'देवमाणूस'मध्ये धक्कादायक ट्विस्ट

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

Crime News: बंद घरात सापडला MBA विद्यार्थिनीचा कुजलेला मृतदेह; परिसरात खळबळ

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव डंपरची १० वाहनांना धडक, १३ जणांचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT