HIGH COURT SLAMS ELECTION COMMISSION OVER COUNTING DATE ERROR, ORDERS NEW GUIDELINES saam tv
महाराष्ट्र

नगरपरिषद निकालाची तारीख बदलली; कोर्टानं आयोगाला सुनावले; गाईडलाइन्ससाठी डेडलाइन, एक्झिट पोलसंदर्भात आदेश

High Court Slams State Election Commission: मतमोजणीची तारीख बदलण्यात आल्यानं उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला सुनावलंय. पुढील १० आठवड्यांच्या आत स्पष्ट निवडणूक मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत. मतदान संपेपर्यंत एक्झिट पोल सादर करू नयेत, असे निर्देश न्यायालयाने दिलेत.

Bharat Jadhav

  • कोर्टाकडून निवडणूक आयोगाला फटकार.

  • पुढील १० आठवड्यांत निवडणुकीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश.

  • मतमोजणी आणि निकाल २१ तारखेलाच घोषित करण्याचे निर्देश

निवडणूक आणि मतमोजणीमधील फेरबदलामुळे राज्य निवडणूक आयोग टीकेचा धनी बनला. आता कोर्टानं मतमोजणीची तारीख बदलावरून निवडणूक आयोगाला सुनावलंय. भविष्यात अशा चुका करू नका म्हणून औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक आयोगाला सुनावलंय. असा घोळ पुढच्या निवडणुकीमध्ये होऊ नये, यासाठी दहा आठवड्यात गाईडलाईन्स तयार करा असे निर्देश न्यायालयानं आयोगाला दिलेत.

नागपूर खंडपीठाचे आदेश कायम ठेवीत मतमोजणी आणि निकाल एकाच दिवशी करावे. २० तारखेच्या मतदान होईपर्यंत एक्झिटपोल ही सादर करू नये, अशा सूचना औरंगाबाद खंडपीठानं केल्या आहेत. हा सगळं निवडणूक आयोगाचा प्रशासानिक घोळ आहे. २१ तारखेला राज्यातील सगळे निकाल द्यावेत. अखेरच्या क्षणी असले घोळ भविष्यात टाळावे याबाबत निवडणूक आयोगाने काळजी घ्यावी, अशी सूचना करण्यात आलीय.

औरंगाबाद खंडपीठाआधी नागपूर खंडपीठानं नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची मतमोजणी बाबत निर्णय दिला होता. राज्यात आज काही भागात मतदान पार पडत आहे. काही ठिकाणी राज्यात २० डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक होणार होती. त्यामुळे दोन्ही मतमोजणी एकाच वेळी घेण्यात यावी, यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज नागपूर आणि औरंगाबद खंडपीठात सुनावणी झाली.

आज झालेल्या निवडणुकीचा निकाल संपूर्ण निवडणूक झाल्याशिवाय जाहीर करू नका. निवडणूक सगळीकडे होत असताना केवळ काही ठिकाणांचे निकाल जाहीर केल्यास त्याचा परिणाम इतर निकालावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकाल आधी जाहीर केल्यास त्या निवडणुकीस न्याय मिळेल असे वाटत नाही, असा युक्तीवाद नागपूर खंडपीठात याचिकाकर्त्यांच्या वकिलाने केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Year Special: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराच्या घरी बनवा टेस्टी प्लम केक

Maharashtra Live News Update: प्रशांत जगताप यांचा राजीनामा जवळपास निश्चित

Rubaab Teaser: तुझ्यासारखी नको तूच पाहिजे...,लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार एक रुबाबदार लव्हस्टोरी

Jabrata: टीव्हीची प्रसिद्ध जोडी मोठ्या पडद्यावर; चित्रपटाचं रोमॅंटिक गाणं प्रदर्शित, रिलीज डेट काय?

आता WhatsApp Chat नको असलेले डिलिट करा, हवे असलेले ठेवता येणार, नवं फीचर आलं, कटकट संपली!

SCROLL FOR NEXT