

निवडणूक अधिकाऱ्यांनी संशय आल्यामुळे तपासणी केली
प्रभाग १५ मधील गांधी प्राथमिक शाळा मतदान केंद्रावरील प्रकार
बुलढाण्यात राजकीय वातावरण तापलं.
संजय जाधव, साम प्रतिनिधी
राज्यातील २६४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. मतदान सुरू झाल्याच्या काही तासानंतर अनेक ठिकाणीनी बोगस मतदारांचा धुमाकुळ बघायला मिळत आहे. बीडनंतर बुलढण्यातही ४ ते ५ जणांना बोगस मतदान करताना पकडलं. त्यांना कॉग्रेस पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला. दुसरीकडे पोलिसांच्या तावडीत सापडलेला बोगस मतदाराला थेट आमदाराच्या मुलानेच पळवून लावलंय.
एकीकडे अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन्समधील तांत्रिक बिघाड, तर दुसरीकडे मतदार याद्यांमधील घोळामुळे मतदारांना मनस्ताप होतोय. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर दीड तासातच २ बोगस मतदार पकडण्यात आले. यामुळे बुलढाणा शहरातील राजकीय वातावरण तापलंय. बुलढाणा नगर पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ मधील गांधी प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा प्रकार घडलाय. कोथळी येथील एका व्यक्तीने वैभव देशमुख नावाचा व्यक्ती दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने मतदान करत होता.
निवडणूक अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्याचा डाव फसला. पोलिसांनी या व्यक्तीसह अन्य एका व्यक्तीलाही बोगस मतदान करण्याच्या प्रयत्नावरून ताब्यात घेतलं. बोगस मतदानाच्या मुद्द्यावरून मतदान केंद्राबाहेर मोठा राडा झाला. बोगस मतदाराला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पकडल्यानंतर त्याला पोलिसांकडे देण्यात आलं, पण शिंदे सेनेतील आमदाराच्या मुलानं त्याला पळवून लावलंय. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पोलिसांच्या हातातून निसटला.
दरम्यान बोगस मतदारांना पकडल्यानंतर काँग्रेसने मोठा आरोप केला आहे. कोथळी, इब्राहिमपूरसह घाटाखालून खासगी वाहनांमधून दोन गाड्या भरून लोकांना बोगस मतदानासाठी बुलढाण्यात आणले गेले, असा दावा काँग्रेस उमेदवारांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.