Unemployed Father Must Pay Child Support, Rules Bombay High Court Saam tv
महाराष्ट्र

पिता बेरोजगार असला तरीही मुलांना पोटगी देणे बंधनकारक: उच्च न्यायालय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.वडील केवळ बेरोजगारीचे कारण पुढे करून आपल्या अल्पवयीन मुलांना पोटगी देण्यापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नसल्याचं न्यायालयाने म्हटलंय.

Bharat Jadhav

  • नागपूर खंडपीठाने पोटगीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

  • बेरोजगार असला तरी वडिलांना मुलांच्या संगोपनाची जबाबदारी टाळता येणार नाही.

  • बुलढाणा कुटुंब न्यायालयाने मुलगा व मुलीला प्रत्येकी ४ हजार रुपये पोटगी मंजूर केली होती.

मु्ंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोटगीला आव्हान देणारी याचिकेवर महत्वपूर्ण निकाल दिला आहे. बेरोजगार असून पित्याला अल्पवयीन मुलांच्या संगोपनाची आणि पोटगीची जबाबदारी टाळता येणार नाही. वडिलांना 'बेरोजगारी' हे कारण सांगता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णय दिला. या मुलांच्या पोटगीला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

न्यायमूर्ती एम. एम. नेर्लीकर यांनी हा ऐतिहासिक निर्णय दिला. एका प्रकरणात १५ जानेवारी २०२६ रोजी बुलढाणा कुटुंब न्यायालयाने मुलाला आणि मुलीला प्रत्येकी ४ हजार रुपये महिना पोटगी मंजूर केली होती. न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध फिर्यादी पित्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, पोटगीला विरोध करताना बेरोजगारीचे कारण सांगितले होते.

मी सध्या बेरोजगार असून पोटगी देण्यासाठी कोणतेही साधन नाहीये. २०२३ मध्ये पत्नीला २.७५ लाख रुपये पोटगी देण्यासाठी रिक्षा विकावी लागली. त्यामुळे मुलांना पोटगी देण्याची क्षमता नाहीये, असे त्याने नमूद केले होते. त्यावर भूमिका मांडताना उच्च न्यायालयाने या कारणांमुळे पिता हा पोटगीच्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नसल्याचं स्पष्ट केले.

पित्याने मुलांच्या देखभालीसाठी दरमहा ३ हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. परंतु त्याने ती रक्कम कधीच दिली नाही. दोन मुले सध्या १० व ७ वर्षे वयाचे आहेत. त्यांचे पालनपोषण करणे ही पित्याची कायदेशीर आणि वैयक्तिक जबाबदारी आहे. बेरोजगारी किंवा अत्यल्प उत्पन्न ही कारणे जबाबदाऱ्या झटकण्यासाठी निमित्त म्हणून वापरता येणार नाही. हे कायद्याचे प्रस्थापित तत्त्व आहे, असेदेखील न्यायालय म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कुणबी नोंदी आणि हैदराबाद गॅझेटनुसार मिळालेल्या नोंदी गाव पातळीवर लावण्याबाबत आढावा बैठक सुरू

Bigg Boss 20 : पहिल्याच दिवशी मोठा गेम! 'बिग बॉस २०' मधील स्पर्धकाला थेट बॉलिवूडमधून सपोर्ट; अभिनेत्रीच्या 'त्या' VIDEO मुळे खळबळ

Accident News : पुण्यात दहीहंडीसाठी निघालेल्या गोविंदाचा मृत्यू, परिसरात हळहळ

बापाने मुलाला घरातून हाकलण्यासाठी लावली पूर्ण ताकद, पण हायकोर्टाने एकाच वाक्यात गेमच उलटवला, वाचा नेमकं काय झालं?

पुढच्या अडीच वर्षांत मी १०० टक्के आमदार होणार, राज ठाकरेंच्या शिलेदारानं ठोकला शड्डू

SCROLL FOR NEXT