Uday Samant on Helmet Mandatory Saam Tv
महाराष्ट्र

Helmet: महाराष्ट्रात हेल्मेट वापराबाबतचा 'ताे' निर्णय व्हावा : उदय सामंत

नागरिकांना जाणिवपुर्वक त्रास झाल्यास संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अहवाल देणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

अमोल कलये

रत्नागिरी : पुणे (pune) पॅटर्नच्या धर्तीवर रत्नागिरीत (ratnagiri) हेल्मेट (helmet) सक्ती केली जाणार नाही असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी नमूद केले. प्राथमिक स्तरावर जिल्ह्यात हेल्मेट परिधान करण्याबाबत प्रबाेधन केले जाईल असेही सामंत यांनी स्पष्ट केले. दरम्यान उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने रविवारी राज्य शासनाच्या सूचनेनूसार जिल्ह्यातील नागरिकांचे (शासकीय कार्यालयीन कर्मचारी) यांचे हेल्मेट वापराबाबत प्रबाेधन करावे असे परिपत्रक काढले आहे (Udaya samant latest marathi news)

सामंत म्हणाले पुण्याच्या जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी पुण्यात घेतलेल्या निर्णयाप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात घ्यावे असे मी सूचविले आहे. त्यामुळे प्राथमिक स्तरावर रत्नागिरी जिल्ह्यात हेल्मेट सक्ती केली जाणार नाही. केवळ प्रबाेधन हाेईल. त्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन विभागाने परिपत्रक काढावे असेही आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यात हेल्मेट वापराचा प्रबाेधनात्मक निर्णय हाेऊ शकताे तर राज्यातील सर्वच जिल्ह्यात देखील ताे व्हावा अशी माफक अपेक्षा मंत्री सामंत यांनी असल्याचे स्पष्ट केले.

नागरिकांनी महामार्गावर जरुर हेल्मेट परिधान करावे असेही मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान नागरिकांना जाणिवपुर्वक त्रास झाल्यास संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अहवाल देणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Designs: जाड अन् बारीक अंगानुसार ब्लाऊज कसा निवडायचा?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक

High Blood Pressure: कोणतीही लक्षणं न दिसता होणारा आजार! हाय BPची कारणे वेळीच ओळखा, अन्यथा...

Road Robbery : सरकारी कर्मचारी अन् ग्रामपंचायत सदस्य मध्यरात्री सावज शोधायचे, हायवेवर सिनेस्टाईल दरोडा टाकायचे; १२ जण जाळ्यात अडकले

Rakesh Bedi: अभिनेत्याने ५१ वर्ष लहान धुरंधर एक्ट्रेस साराला केलं Kiss, नेटकऱ्यांना पटलं नाही, पाहा नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT