Kalyan Dombivali Heavy Rain Saam TV
महाराष्ट्र

Kalyan Dombivli Rain: 200-250 घरांमध्ये पाणी घुसलं; नाले तुंबले, रस्त्यांवर पाणीच पाणी; कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस, VIDEO

Kalyan Weather Update: कल्याण- डोंबिवली परिसरात सुरवातीला पाऊस झाला आहे. मात्र आज सकाळपासून जोरदार पाऊस होत आहे.

Rajesh Sonwane

अभिजीत देशमुख, कल्याण

डोंबिवली : कल्याण डोंबिवली परिसरात सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन तासांपासून कल्याण- डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने दाणादाण उडाली आहे. कल्याणच्या पिसवली गावातील सुमारे २०० ते २५० घरांमध्ये पाणी शिरले आहे. 

कल्याण- डोंबिवली परिसरात सुरवातीला पाऊस झाला आहे. मात्र आज सकाळपासून जोरदार पाऊस होत आहे. साधारण दोन तासांपासून जोरदार पावसाच्या सारी कोसळत असून पावसामुळे कल्याण- डोंबिवलीतील रस्ते जलमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे कल्याण पूर्वेकडील पिसवली गावातील दोनशे ते अडीचशे घरांमध्ये पावसाचे (Rain) पाणी शिरले आहे. या गावातील नाल्याचा प्रवाह संबंधित विकास कामांमुळे बदलल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे स्थानिकांनी सांगितले. 

महापालिका प्रशासनाला याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आलय आहेत. मात्र महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला. पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे मात्र प्रचंड हाल झाले. घरातील वस्तूंचे नुकसान झालं. सध्या महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून याची पाहणी करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : नागपूर हादरले, ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू, भाचीला वाचवण्यासाठी गेलेल्या मामाचेही निधन

Maharashtra Live News Update: - नाशिकमध्ये थंडीची चाहूल, नाशिककरांनी आज अनुभवली धुक्याची चादर

Leopard : पुण्यानगर नगरमध्येही बिबट्याचा हल्ला, ४ वर्षाच्या चिमुकलीचा घेतला बळी

Bihar Elections : बिहारमध्ये १२१ जागांसाठी आज मतदान, तेजस्वी-सम्राट यांच्यात थेट सामना, तर भाऊ तेज प्रतापची स्वतंत्र लढत

RBI नं विकलं 35 टन सोनं? 60 हजार कोटींचं काय केलं?

SCROLL FOR NEXT