Maharashtra Rain News Latest Updates Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rainfall: राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच, कोकण- घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट; दसऱ्यानंतर पाऊस ओसरणार

Maharashtra Weather Updates: राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. आजही राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू असणार आहे. कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट देण्यात आला आहे वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे.

  • कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात आज येलो आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे.

  • दसऱ्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

  • शेतकऱ्यांचे पिकांचे आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे.

महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. शेती, घरांचे नुकसान झालं. जनावरं दगावली. त्यामुळे बळीराजा संकटात आहे. आजही राज्यात पावसाचा रुद्रावतार पाहायला मिळणार आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे याठिकाणच्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क रहावे असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र आणि परिसरात कमी दाब प्रणाली निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज उत्तर कोकण आणि लगतच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा घाटमाथ्यावर, कोल्हापूर घाटमाथ्यावर तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात परतीचा पाऊस चांगलाच धुमाकूळ घालत आहे. दसऱ्यापर्यंत राज्यात पाऊस राहिल. दसऱ्यानंतर पाऊस ओसरेल असे हवामान खात्याने सांगितले. दसऱ्यानंतर पावसाचा वेग कमी होईल. सध्या बीड, नांदेड, लातूर, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यांत पावसाचा रौद्रावतार पाहायला मिळत आहे. नदी, नाल्यांना पूर आला असून शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्यामुळे बळीराजा सध्या संकटात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमच्या ताटातील मासे गायब होणार? समुद्राचं पाणी होतंय विषारी

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ हजर झाला नाही तर त्याची सर्व मालमत्ता जप्त करणार- पोलिसांचा इशारा

Face Care: सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किनसाठी घरगुती हे सीरम करा ट्राय, आठवड्याभरात दिसेल फरक

गृहयुद्धामुळे हाहाकार, रुग्णालयात एअर स्ट्राईक 30 जणांचा मृत्यू, 70 जखमी

RITES Recruitment: सरकारी नोकरीची संधी! RITES मध्ये भरती सुरु; पगार किती? अर्ज कसा करावा? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT