Nashik Rain: नाशिकमध्ये पावासाचा हाहाकार; गोदावरीच्या पुराच्या पाण्यात कंटेनर वाहून गेला

Nashik Faces Extreme Flooding: नाशिकमध्ये मुसळधार पाऊस व गोदावरी नदीच्या पूरामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. रामतीर्थ गोदावरी घाटावर कंटेनर वाहून गेला असून आरतीसाठी लागणारी साहित्य पाण्यात हरवली आहे.
Nashik heavy rain Godavari river flood
Nashik heavy rain Godavari river floodSaam Tv
Published On

यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात भयंकर पूर गोदावरी नदीला आला असून, नदीने आपला रौद्ररूप दाखवला आहे. या पूरामुळे नाशिकमधील रामतीर्थ गोदावरी समितीच्या गोदा घाटावरचा कंटेनर वाहून गेला. हा कंटेनर आरतीसाठी लागणारी विविध सामग्रीसह ठेवण्यात आला होता. परंतु, पुराच्या जोरदार पाण्याने कंटेनरला नदीत वाहून नेले. परिणामी आरतीसाठी लागणारी सर्व साहित्य पुराच्या पाण्यात हरवली आहे. या घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी हा कंटेनर वाहून जातानाचा विडिओ बनवून सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

यंदा पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा पाणीस्तर अत्यधिक वाढला असून, नदीने अनेक भागांत धोकादायक स्वरूप धारण केले आहे. प्रशासन आणि स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Nashik heavy rain Godavari river flood
Buldhana Accident : भरधाव कारचा टायर फुटला, विरुद्ध दिशेला जात दुचाकीला धडक; पिता- पुत्राचा मृत्यू

मध्यरात्रीपासून मुसळधार; रस्त्यांना जलशयाचे स्वरूप

शहर आणि परिसरात शनिवारी सायंकाळनंतर जोरदार पावसाच्या हाजेरीने सर्वत्र पाणीचपाणी झाल्याचे पाहायला मिळाले.काल रात्री साडे वाजेपर्यंतच 42.2 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर होता. हवामान खात्याकडून रविवारी नाशिक शहरासाठी ऑरेंज, तर ग्रामीण भागातील घाट प्रदेशासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Nashik heavy rain Godavari river flood
Thane Corporation : अनधिकृत बांधकामाच्या ५० प्रकरणात गुन्हे दाखल; ठाणे महापालिकैची कारवाई

भिंत पडून एका बाईचा मृत्यू

जिल्ह्यातील पावसाचा जोर कायम होता. खालचे टेंभे, ता. बागलाण येथे वादळी पावसाने घराची भिंत पडून कस्तुरबाई भिका अहिरे (78) यांचा मृत्यू झाला. मालेगाव तालुक्यातील मळगाव शिवारात वीज पडल्याने 16 वर्षीय समाधान वाकळे हा मेंढपाळ जखमी झाला.

सप्तशृंगी गडासह येवला तालुक्यात मुसळधार पावसामुळे मका, सोयाबीन, कांदा पुन्हा पाण्याखाली गेला आहे. मनमाड, निफाड, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी देखील दमदार पावसाने हजेरी लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com