Navratri Utsav : सप्तशृंगी मंदिर २४ तास दर्शनासाठी राहणार खुले; देवीच्या आभूषणांची मिरवणूक काढत नवरात्र उत्सवाला प्रारंभ

Nashik News : गडाच्या पहिल्या पायरीपर्यंत संबळ, डफ व पारंपारिक वाद्यावर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मंदिरात गाभाऱ्यात जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली
Navratri Utsav
Navratri UtsavSaam tv
Published On

अजय सोनवणे 
नाशिक
: आजपासून आदिशक्तीच्या जागराला सुरवात झाली असून ठिकठिकाणी घटस्थापना करण्यात येत आहे. यात साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. देवीच्या आभूषणांची सवाद्य मिरवणूक काढत उत्सवाला सुरवात झाली आहे. दरम्यान भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. 

शारदीय नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात होत आहे. घटस्थापना करत देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असून आजपासून पुढील नऊ दिवस देवीचे उपवास व पूजा केली जाणार आहे. तर भाविक देखील आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला तसेच देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जात असतात. त्यानुसार आजच्या पहिल्या माळेला भाविक दर्शनासाठी सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जाण्यास सुरवात झाली आहे. 

Navratri Utsav
Solapur : तडिपारीच्या नोटिसीला आव्हान; गुन्हेगाराला हायकोर्टाने सुनावला एक लाख रुपयांचा दंड

मिरवणूक काढत घटस्थापना 

दरम्यान आजपासून सुरु झालेल्या नवरात्री उत्सवाला सप्तशृंगी गडावर सुरवात झाली असून देवीच्या आभूषणांची मिरवणूक काढण्यात आली. श्री सप्तशृंगी निवासिनी ट्रस्ट कार्यालयात जिल्हा सत्र न्यायाधीश अजय लोहाटी यांच्या हस्ते आई भगवतींच्या आभूषणाची पूजा करून ट्रस्ट कार्यालयापासून गडाच्या पहिल्या पायरीपर्यंत संबळ, डफ व पारंपारिक वाद्यावर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मंदिरात गाभाऱ्यात जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.

Navratri Utsav
Nagpur Crime : व्यसनासाठी धक्कादायक कृत्य; दोन सख्ख्या भावांचा कारनामा उघड

२४ तास राहणार मंदिर खुले 

नवरात्री उत्सवाच्या नऊ दिवस गडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तर नवरात्रीचे सर्व दिवस भाविकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे देवीचे मंदिर पुढील नऊ दिवस भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना दर्शन घेणे सोयीचे होणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com