Nagpur Crime : व्यसनासाठी धक्कादायक कृत्य; दोन सख्ख्या भावांचा कारनामा उघड

Nagpur News : ड्रगचे व्यसन असल्याने व्यसन पूर्ण करण्यासाठी पैसे नव्हते. यामुळे काही करून पैसे मिळवायचे आणि व्यसन पूर्ण करण्यासाठी दोघं भावांनी दुचाकी चोरी करण्यास सुरवात केली
Nagpur Crime
Nagpur CrimeSaam tv
Published On

पराग ढोबळे

नागपूर : व्यसनाची सवय लागल्याने ते पूर्ण करण्यासाठी कोणत्या थराला जातील हे सांगणे अवघड आहे. असाच काहीसा प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला आहे. व्यसन पूर्ण करण्यासाठी खिशात पैसे नसल्याने मोटारसायकल चोरी करण्याचा धंदा दोन भावांनी सुरु केला होता. पोलीस तपासात हे धक्कादायक कृत्य समोर आले असून दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

नागपूर शहरातील विविध भागात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याबाबत प्राप्त तक्रारींवरून पोलिसांनी तपास सुरु केला होता. या तपासात पोलिसांनी ऋषभ पसोपा व ऋतिक पसोपा या दोन सख्ख्या भावांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. या दोन्ही आरोपी भावांना ड्रगचे व्यसन असल्याने व्यसन करायला पैसे मिळवण्यासाठी ते दुचाकी चोरी करत असल्याची माहिती पोलिस चौकशीत समोर आली आहे. 

Nagpur Crime
Solapur : तडिपारीच्या नोटिसीला आव्हान; गुन्हेगाराला हायकोर्टाने सुनावला एक लाख रुपयांचा दंड

चोरीचे वाहन दलालाकडे गहाण ठेवत 

व्यसनाचा खर्च भागविण्यासाठी मोटर सायकल चोरी करणाऱ्या दोन सख्खे भाऊ असलेल्या आरोपीला अटक केली आहे. दरम्यान चौकशीत सदरील आरोपी हे वाहन चोरी करून वाठोडा परिसरातील दलालाकडे ते गहाण ठेवून पैसे मिळवायचे. यानंतर या पैशातून व्यसन पूर्ण करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

Nagpur Crime
Ladki Bahin EKYC : लाडक्या बहिणींना ई-केवायसीमध्ये अडचणी; तांत्रिक अडचणींमुळे वेबसाईड होतेय बंद

५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

दरम्यान दुचाकी चोरीचा तपास करत असताना पोलिसांना सुगावा लागला होता. त्यानुसार हुडकेश्रर पोलिसांनी जवळपास १०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दरम्यान पोलिसांनी या कारवाईत ५० चोरीची वाहने असा जवळपास ५० लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपींनी या आधी कुठे चोरी केली का? किंवा पूर्वीचे गुन्हे दाखल आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com