Paithan Heavy Rain : पावसाचा हाहाकार; पैठण शहरातील अनेक घरात शिरले पाणी, १२५ पेक्षा जास्त कुटुंबाचे स्थलांतर

Sambhajinagar News : संभाजीनगर जिल्ह्यातील सगळ्यात तालुक्यात अतिवृष्टीमुळे दाणादान उडाली आहे. या परिस्थितीची माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून माहिती दिली
Paithan Heavy Rain
Paithan Heavy RainSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पैठण शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. त्याचबरोबर पैठणच्या जायकवाडी धरणातून दोन लाख क्युसेसने पाणी गोदावरी नदीपात्रात विसर्ग करण्यात येत असल्याने नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे आता या ठिकाणच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने स्थलांतरित करण्यात येत असून आतापर्यंत १२५ कुटुंबियांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून पैठण शहराच्या विविध भागांमध्ये पाणी शिरले असल्यामुळे अनेक नागरिकांना पैठण शहरातील मंगल कार्यालय, शाळा यामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. तर  नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालू नाही, पाणी शहरात येण्या अगोदरच नागरिकांनी स्थलांतर केलेल्या ठिकाणी थांबावे. प्रशासनाच्या वतीने या नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

Paithan Heavy Rain
Paithan Rain : शेतातून घरी येताना नदीत शेतकरी बुडाला; गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर काढले बाहेर

१२५ कुटुंबांचे स्थलांतर 

पैठण शहरातील जवळपास १२५ कुटुंब स्थलांतरित करण्यात आले आहे. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीमध्ये नगरपरिषदेच्या वतीने एक हेल्पलाइन नंबर तयार करण्यात आलेला आहे. त्यावरती नागरिकांनी संपर्क साधला असता त्यांना सुविधा पुरविल्या जातील. तसेच मदत देखील केली जाणारं असल्याची माहिती नगरपरिषदेच्या मुख्यधिकारी डॉ.पल्लवी अंभोरे यांनी दिली आहे.

Paithan Heavy Rain
Nanded Accident : उपचारासाठी जाणाऱ्या पिता-पुत्राचा वाटेतच मृत्यू; ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झाला अपघात

सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टी 

सिल्लोड तालुक्यातील अंभई मंडळामध्ये सर्वाधिक १४५ मिलिमीटर पाऊस झाला. त्या खालोखाल निल्लोड मंडळामध्ये ११५ मिलीमीटर पाऊस झाला. तसेच आमठाणा मंडळात आतापर्यंत पाच ते सहा वेळा अतिवृष्टी झाली असून काल रात्री देखील येथे ७० मिलिमीटर एवढा पाऊस झाला. या पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांनी तालुक्यातील विविध गावात झालेल्या नुकसानीची पाहणी करून गावकऱ्यांशी संवाद साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com