Raigad Rain  saam tv
महाराष्ट्र

Raigad rain : पेण तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले; नागरिकांच्या घरात शिरलं पाणी

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्‍याला ढगफुटी सदृश्य पावासाने चांगलेच झोडपले आहे. पेण तालुक्यात आज, बुधवारी संध्याकाळी ढगफुटी सदृश्य झाला.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

Raigad rain News : रायगड (Raigad) जिल्ह्यातील पेण तालुक्‍याला ढगफुटी सदृश्य पावासाने (Rain) चांगलेच झोडपले आहे. पेण तालुक्यात आज, बुधवारी संध्याकाळी ढगफुटी सदृश्य झाला. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटसह झालेल्या तासाभराच्‍या पावसाने पेण शहर आणि तालुक्‍यातील अनेक गावात पाणी साचले. मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्‍या गडब गावातील नाला ओसंडून वाहू लागला. मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यातील एकच नागरिकांची तारांबळ उडाली.

येत्या दोन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेल्यानुसार आता राज्यभरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. रायगडच्या पेण तालुक्यात ढगफुटी सदृश्य झाला. त्यामुळे जोरदार पावसाने नागरिकांची दैना उडवली.

मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्‍या पेण तालुक्यातील गडब गावातील नाला ओसंडून वाहू लागला. त्यामुळे गावातील नाल्याला नदीचे स्वरुप आले होते. नाल्याचे पाणी उलटल्याने गावातील घरांमध्ये पाणी शिरले. मुसळधार पावसामुळे अनेक वाहने पाण्यात अडकून पडली होती. गडब परिसरातील इतर गावांनाही या पावसाचा जोरदार फटका बसला.

...म्हणून संतप्त नागरिकांनी अडवला मुंबई-गोवा महामार्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई-गोवा महामार्गाला (Mumbai-Goa Highway) बसला आहे. मुसळधार पावसामुळे महामार्गावरील कणकवली-नांदगाव येथील घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी भर पावसात रस्त्यावर उतरत एक तासाहून अधिक वेळ महामार्ग रोखून धरल्याची माहिती समोर आली आहे.

तब्बल एक तासाहून जास्त वेळ महामार्ग रोखल्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे वाहनचालकांची चांगलीचं तारंबळ उडाली आहे. ग्रामस्थानी महामार्ग रोखल्यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT