Ganesh Festival: गणेश मंडळांना दिलासा; विसर्जन मिरवणुकींची वेळ वाढवण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्र्यांनी गणेश मंडळांना उद्या रात्री १२ वाजेपर्यंत मिरवणूक काढण्याची परवानगी दिली आहे.
Ganeshotsav Pune 2022
Ganeshotsav Pune 2022Saam TV

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज पुणे दौऱ्यावर असून त्यांनी आज पुण्यातील (Pune) अनेक गणेश मंडळांना भेटी देत गणेश दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी उपनगरातील गणेश मंडळांना उद्या रात्री १२ वाजेपर्यंत मिरवणुका काढण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे.

उपनगरातील गणेश मंडळे उद्या रात्री मिरवणुका काढत असतात. मात्र, रात्री १० वाजेपर्यंतच मिरवणुका काढायला परवानगी असते. त्यामुळे मिरवणुकींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी गणेश मंडळांनी मुख्यमंत्र्यांजवळ केली होती. गणेश मंडळांची मागणी मान्य करत मुख्यमंत्र्यांनी उद्या रात्री १२ वाजेपर्यंत मिरवणुकांसाठी परवानगी दिली आहे.

पाहा व्हिडीओ -

सिंहगड रस्ता परिसरातील संकल्प मित्र मंडळाच्या गणेश दर्शनासाठी ते आले असताना त्यांनी थेट मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, हे जनतेचे सरकार आहे, जनतेच्या भावनांचा विचार केला जाईल. मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा करा असे म्हणताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Ganeshotsav Pune 2022
...तर पोलिसांना सोडणार नाही, अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सव सुरु झाल्यापासून मुंबईसह मुंबई उपनगरातील अनेक गणेश मंडळांना भेटी देत आहेत. यंदाचा गणेश उत्सव जल्लोषात करण्यासाठी अनेक निर्बंध उठवले आहेत. अशातच ते आज पुण्यात आले असता काही गणेश मंडळांनी मिरवणुकीची वेळ १० वाजेपर्यंत असते ती वाढवून देण्याची मागणी केली असता, मुख्यमंत्र्यांनी ती तत्काळ मान्य केली. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com