Heat Wave  Saam TV
महाराष्ट्र

Heatwave Alert News: उष्णतेमुळे ब्लॅकआऊटचा धोका, जीवही जाऊ शकतो; हवामान विभागाचा नागरिकांन इशारा

Heatwave Alert News: राज्यातील वाढलेलं तापमानही चिंतेचा विषय बनला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Heat Wave News : देशभरात उष्णता वाढीता तडाखा नागरिकांना बसताना दिसत आहे. तापमानाचा वाढलेला पारा नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण बनलं आहे. राज्यातील वाढलेलं तापमानही चिंतेचा विषय बनला आहे.

राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या विभागांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती आहे. नागरिकांनी उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत शक्यतो बाहेर पडू नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानेही टेन्शन वाढलं आहे. आठवडाभरापासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान हवामान विभागाकडून ब्लॅकआउटचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना उष्माघाताचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

उष्णतेच्या लाटेचा प्रभाव इतका गंभीर होत चालला आहे की, आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. दिवसभर उन्हात कष्टाचं काम करणाऱ्यांना या उष्णतेचा सर्वात जास्त धोका आहे. भारतीय हवामान विभागाने हरियाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशासह अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी केला आहे. (Latest News Update)

देशातील अनेक राज्यांमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त आहे. ओडिशाच्या अनेक भागात सोमवारी तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले होते. हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात यावर्षी सामान्यपेक्षा जास्त उष्णता आहे. 2022 मध्येही अशीच स्थिती होती.

लोकांनी गरज असेल तर भर उन्हात बाहेर पडावं. फिक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे घालावे. डोके झाकावे असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये तर तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी या आठवड्यात सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT