Heat Wave, Jalgaon saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : उन्हाचा फटका, जळगावात दाेन महिलांचा मृत्यू; उष्माघाताचा अंदाज, प्रशासन म्हणाले...

नागरिकांनी उन्हात जास्त वेळ थांबू नये असा सल्ला वैद्यकीय अधिकारी यांनी दिला आहे.

Siddharth Latkar

- संजय महाजन

Heat Wave In Jalgaon : जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यात उष्णतेची लाट असून नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक बनले आहे. जळगाव जिल्ह्यात सकाळी साडे सातच्या सुमारासच नागरिकांना उन्हाचे चटके बसू लागले आहे. जिल्ह्याते तापमान 45 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे. दरम्यान जिल्ह्यात एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. (Maharashtra News)

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील नम्रता चौधरी (namrata chaudhary) या कुटुंबासमवेत उन्हात नातेवाईकांच्या एका धार्मिक कार्यासाठी गेल्या हाेत्या. परतीच्या प्रवासानंतर त्यांना बस स्थानक परिसरात उलट्या झाल्या आणि चक्कर आली. त्यामुळे त्या घटनास्थळीच कोसळल्या.

नम्रता यांच्या नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यास नेले. तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी नातेवाईकांना सांगितलं. नम्रता चौधरी यांची लक्षणं पाहता त्यांचाही उष्माघाताने (heat wave) मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

जिल्हाधिकारी अमित मित्तल (amit mittla) यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बाेलताना संबंधित महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे असा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे म्हटलं आहे.

तांबेपुरा येथे महिलेचा मृत्यू

दरम्यान अमळनेरात विवाहित महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी अमळनेर शहरातील तांबेपुरा भागात घडली. रुपाली राजपूत असे मयत महिलेचे नाव आहे. यंदाच्या मोसमातील जळगाव जिल्ह्यातील उष्माघाताचा हा बळी असल्याचे मानले जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये 'तारक मेहता का उलटा चश्मा'मधील 'या' सदस्याची एन्ट्री, कोण आहे ती?

Gk : मोठ्या प्राण्यांचे तोंड लांब का असते? कारण वाचून तुम्ही ही पडाल विचारात

Maharashtra Live News Update : मंत्री गिरीश महाजन शिक्षकांच्या आंदोलन स्थळी

Dhule News: पांझरा नदीला पूर, दुचाकीस्वाराचा जीवघेणा प्रवास, स्थानिकांच्या मदतीनं बचावला; काळाजाचा ठोका चुकवणारा VIDEO

मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी, निकेत कौशिक यांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT